आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबादास दानवे, म्हात्रेंची पोलिसांत तक्रार:शीतल म्हात्रे- आ. सुर्वेंचा "तो' व्हिडिओ 23 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला, 32  देशांत पोहोचला

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा "तो' वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर २३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला असतानाही मंगळवारी विधान परिषदेत पुन्हा हा मुद्दा गाजला. ३२ देशांतील लोकांनी "तो' वादग्रस्त व्हिडिओ पाहिला आहे आणि मी स्वतः १० लोकांना व्हिडिओ शेअर केला आहे, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान, शीतल म्हात्रे यांनी या प्रकरणी दादर पोलिसांत तक्रार दिली.

दानवे म्हणाले, आमदार सुर्वे यांचा मुलगा राज याच्या फेसबुक अकाउंटची चौकशी झाली पाहिजे. त्याने फेसबुक वरून व्हिडिओ का डिलिट केला? याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी दानवे यांनी केली. दरम्यान, या प्रकरणात साईनाथ दुर्गे आणि अक्षय धंदर यांना बोरिवली न्यायालयाने १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...