आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण:आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय असल्याने कारवाई, साईनाथ दुर्गे यांचा आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी कोणत्याही पेजचा अ‍ॅडमिन नाही- साईनाथ दुर्गे - Divya Marathi
मी कोणत्याही पेजचा अ‍ॅडमिन नाही- साईनाथ दुर्गे

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी साईनाथ दुर्गे यांनी माझा कसलाच संबंध नाही असे स्पष्ट केले आहे. तर मी कोणत्याही पेजचा अ‍ॅडमिन नाही, केवळ आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय असल्याने माझ्यावर कारवाई करण्यात आली. व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा मी मुंबईत देखील नव्हतो असे साईनाथ दुर्गे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

साईनाथ दुर्गे म्हणाले की, मी पहिल्या दिवसांपासून काही सांगत होतो याचा आणि माझा काही संबंध नाही. मी 11 ते 13 तारखे दरम्यान मुंबईत नव्हतो. माझ्या कुठल्याही ऑफीशियल सोशल मिडीयावर तो व्हिडिओ शेअर केला नाही. मला चौकशी साठी घेऊन जातो म्हणत सोबत नेण्यात आले, आणि अटक करण्यात आली. कदाचित मी आदित्य ठाकरे यांच्या कोअर कमिटीमध्ये असल्याने तर ही कारवाई झाली नाही ना असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नेमके प्रकरण काय?

शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आल्याचे शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ करणाऱ्या मुख्य आरोपाचा शोध घेण्यासाठी दहिसर पोलिसांनी फेसबूक कंपनीलाही पत्र पाठवले होते. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर या प्रकरणी आरोप केले होते. मातोश्री पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत दोघे झाले होते सहभागी

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहिसरमधील रॅलीत सामील झाले होते. या रॅलीमधीलच शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर टाकून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलिस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबूक पेज चालवणारे विनायक डावरे यांच्यासह इतर तिघांना अटक करण्यात आली होती.