आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद सोमवारी (१३ मार्च) विधानसभेत उमटले. या प्रकरणाची आयपीएस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली. व्हिडिओ एडिट करून व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या विनायक डावरेंसह चार जणांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सूत्रधारालाही शोधून काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी हा प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केली. जाधव यांच्या या मागणीला मनीषा चौधरी यांनी पाठिंबा दर्शवत या महिलेचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. संपूर्ण राज्यात काही दिवसांपूर्वी महिला दिन साजरा करण्यात आला.
त्यानंतर अशा प्रकारची घटना समोर येणे निंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. हा व्हिडिओ कुणी मॉर्फ केला हे शोधून काढून त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर सत्ताधारी पक्षातील जवळपास सर्वच पक्षाच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी १० मिनिटांसाठी सभागृहाचे काम स्थगित केले. त्यानंतर भारती लव्हेकर यांच्यासह इतर अनेक आमदारांनी याप्रश्नी कारवाई करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही अशा प्रकारे व्हिडिओ मॉर्फ केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.