आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शर्लीनचे खुलासे:शर्लीनने व्हॉट्सअ‍ॅप चॅटसह कराराच्या प्रत सोपविल्या; म्हणाली- या रॅकेटमध्ये अडकलेल्या महिलांची मदत करायची आहे, कितीही प्रश्न विचारा!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्नोग्राफी प्रकरणी क्राइम ब्रांचच्या विशेष पथगकाने मॉडेल शर्लीन चोप्राची 8 तास चौकशी केली. शर्लीन चौकशीसाठी क्राइम ब्रांचमध्ये शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास पोहोचली होती. त्यानंतर रात्री 8 वाजता ती कार्यालयातून बाहेर पडली. या दरम्यान तिने राज कुंद्रा आणि पोर्नोग्राफी संदर्भात अनेक खुलासे केले आहेत. तिने राजच्या विरोधात काही गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.

सध्या तुरुंगात असलेल्या राज कुंद्राच्या 'आर्म्सप्राइम मीडिया' या कंपनीसोबत शर्लीनचा करार होता. या कराराची एक प्रत घेऊनच शर्लीन चौकशीसाठी हजर झाली होती. क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेल विभागाने कलम 160 नुसार तिला समन्स बजावले होते. बाहेर पडताच तिने माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 8 तास झालेल्या चौकशीमध्ये 'आर्म्सप्राइम मीडिया' कंपनीसोबत असलेल्या कराराबद्दल विचारणा झाली. यासोबतच कुंद्राशी कसे संबंध होते? त्याच्या इतर कंपन्यांबद्दल काय माहिती आहे? असे प्रश्न विचारण्यात आल्याचे शर्लीनने सांगितले.

राज कुंद्रानेच पोर्न बिझनेसमध्ये आणल्याचा आरोप
शर्लीनने राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानुसार, राज कुंद्रामुळेच ती पोर्न बिझनेसमध्ये गेली. राजनेच तिला अश्लील कंटेन्टवर काम करण्यास सांगितले होते. सुरुवातीला त्याने एक भूमिका ऑफर केली होती. त्यानंतर अश्लील कंटेन्ट बनवण्यास सांगितले. राजनेच आपल्याला हॉटशॉट अ‍ॅपवर शूट करण्यासाठी सांगितले होते. परंतु, आपण नकार दिला असे शर्लीनने सांगितले.

शर्लीनचा दावा, कुंद्रा-शिल्पाचे संबंध गुंतागुंतीचे
शर्लीनने सांगितल्याप्रमाणे, राज कुंद्रा 27 मार्च 2019 रोजी तिच्या घरात आला होता. त्यावेळी त्याने आपल्यासोबत बळजबरी संबंध बनवण्याचा प्रयत्न केला. ती कुंद्राला विरोध करत होती. "मला वैयक्तिक आयुष्य आणि बिझनेस वेगळेच ठेवायचे होते. सोबतच, एका विवाहित पुरुषासोबत मला संबंध ठेवायचे नव्हते. पण, तोच म्हणाला, की मी शिल्पा शेट्टीसोबतच्या नात्यात सुखी नाही. शिल्पासोबत राहून मी नेहमीच तणावात असतो असे त्याने मला सांगितले होते."

राखी सावंतच्या आरोपांबद्दल काय म्हणाली शर्लीन
शर्लीनने सांगितले, की तिने पोलिसांसमोर मोठे खुलासे केले आहेत. आपण या रॅकेटमध्ये अडकलेल्या महिलांची मदत करू इच्छितो. त्यामुळे, पोलिसांनी मला हवे तेवढे प्रश्न विचारावे असे तिने सांगितले आहे. दरम्यान, राखी सावंतने कुठल्याही तथ्याचा आधार नसताना कुणाबद्दलही काहीही बोलू नये असे ती पुढे बोलताना म्हणाली.

उल्लेखनीय बाब म्हणजे, राखी सावंतने यापूर्वी बोलताना शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचे कौतुक केले होते. राज एक सन्मानित व्यक्ती तर शिल्पा शेट्टी खूप होतकरू अभिनेत्री आहे. काही लोक शिल्पा आणि राज यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज कुंद्राने काहीही वाइट केले असे मला वाटत नाही. तो एक प्रतिष्ठित माणूस आहे असे राखी म्हणाली होती.

वॉट्सअ‍ॅप चॅट, कराराच्या कॉपी दिल्या
अधिकाऱ्यांनी मला आश्वस्त केले की ही कारवाई लक्ष्य करून केली जात नाही. यात मी आपले व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि करारांसह आवश्यक कागदपत्रांच्या प्रत दिल्या. शर्लीनने हीच कागदपत्रे यापूर्वी महाराष्ट्राच्या सायबर सेलला दिली आहेत.

19 जुलैपासून पोलिसांच्या तावडीत राज कुंद्रा
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी त्याच्या घरातून अटक केली होती. तेव्हापासूनच तो कैदेत आहे. कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीला सोबत ठेवून दोघांची समोरासमोर चौकशी सुद्धा करण्यात आली आहे. परंतु, शिल्पाचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे पुरावे अद्याप पोलिसांकडे नाहीत. त्यामुळेच शिल्पाला या प्रकरणापासून दूर ठेवण्यात आले आहे. शिल्पाने आतापर्यंत टाकलेले पतीचे जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आले आहेत. आता आणखी एका जामीन अर्जावर 10 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...