आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Shilpa Raj's Joint Bank AccountShilpa Shetty's Husband Raj Kundra Now Be Charged Under Money Laundering And Foreign Exchange Violation Acts By ED

पॉर्न फिल्म प्रकरण:शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या जॉइंट अकाउंटमध्ये विदेशातून आला पैसा; आता ईडी मनी लॉन्ड्रिंगचा तपास करेल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • PMLA आणि FEMA अंतर्गत समन्स बजावले जाईल

मुंबई पोलिसांच्या चौकशीनंतर आता अंमलबजावणी संचालनालय (ED) राज कुंद्रावरील कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडी कुंद्राविरोधात मनी लॉन्ड्रिंग आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA) अंतर्गत 26 जुलैनंतर कधीही गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. प्रोटोकॉलनुसार मुंबई पोलिस ईडीला परकीय चलन उल्लंघनासह आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यास सांगतील.

PMLA आणि FEMA अंतर्गत समन्स बजावले जाईल
गुन्हा नोंदवल्यानंतर संचालक चौकशी सुरू करण्यापूर्वी एफआयआरची प्रत मुंबई पोलिसांकडून घेतील. चौकशी करण्यापूर्वी ईडी कुंद्राविरोधात आणि मनी लॉन्ड्रिंग आणि फेमाअंतर्गत समन्स बजावू शकते. अश्लिल चित्रपट बनवून अॅप्सच्या माध्यमातून रिलीज केल्याच्या आरोपात राज कुंद्राला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी कुंद्राच्या कोठडी 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

शिल्पाचीही चौकशी झाली, मुंबई पोलिसांकडून क्लीनचीटही मिळाली

 • शुक्रवारी शिल्पाला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जॉइंट अकाउंटवरुन केलेल्या व्यवहारांबद्दल चौकशी केली होती. तिच्या घराचीही झडती घेण्यात आली होती.
 • शिल्पाला जवळपास 20-25 प्रश्न विचारले गेले होते आणि त्यापैकी बहुतेक आंतरराष्ट्रीय एक्सचेंजबद्दल होते. या जोडप्याचे राष्ट्रीयकृत बँकेत जॉइंट अकाउंट आहे.
 • एका अधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्या खात्यातील निधी परदेशातून बर्‍याच मार्गांनी आला आहे. याची तपासणी केली गेली असून आम्ही फॉरेन्सिक तज्ञांचीही मदत घेत आहोत.
 • खरेतर, मुंबई पोलिसांनी कथितरित्या शिल्पाला क्लीन चिट दिली आहे. कारण पॉर्न रॅकेटमध्ये तिच्या भागीदारीविषयी काहीच पुरावा मिळालेला नाही.

तपासात अनेक गोष्टींचा खुलासा

 • तपासात समोर आले आहे की, शिल्पाच्या अकाउंटमध्ये एक मोठी रक्कम अफ्रीका आणि लंडनहून ट्रान्सफर झाली आहे. याची माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटपासून लपवण्यात आली.
 • कुंद्राविरुद्ध क्रिकेट सट्टेबाजीचे पुरावे सापडले आहेत. त्याचे काही पैसे शिल्पाच्या अकाउंटमध्येही ट्रान्सफर करण्यात आले होते. सूत्रांनुसार अनेक वेळा सट्टेबाजीच्या वेळी बरेचदा अभिनेत्रीचे बँक खाते वापरले गेले.
 • मुंबई पोलिसांनुसार शिल्पाला कुंद्राच्या सर्व व्यवसायाविषयी आणि इतर संबंधित गोष्टींची पूर्ण माहिती होती परंतु आता ती त्याला वाचवण्यासाठी नकार देत आहे.
बातम्या आणखी आहेत...