आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन खुलासा:राज कुंद्राला पाहताच भडकली होती शिल्पा शेट्टी; म्हणाली- तुझ्यामुळे माझ्या हातातून कित्येक प्रोजेक्ट निघून गेले, माझ्यासह अख्खे कुटुंब बदनाम झाले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

पोर्न प्रकरणात सुरू असलेल्या तपासामध्ये नव-नवीन खुलासे समोर येत आहेत. पती राज कुंद्राचे पोर्न प्रकरण समोर येताच शिल्पाने त्याच्या कंपनीत संचालक पदाचा राजीनामा दिला. तरीही तिला चौकशीसाठी सामोरे जावे लागलेच. राज कुंद्रा नेमके काय करायचा हे कुणालाही माहिती नव्हते. केवळ शिल्पा शेट्टीचा पती अशीच त्याची ओळख होती. अशात राज कुंद्रा संदर्भातील बातम्या सुद्धा शिल्पा शेट्टीचा पती अशाच नावाने झळकल्या. त्यात जेव्हा शिल्पा शेट्टीला पतीसमोर आणले गेले तेव्हा तिने आपला सगळा राग काढला.

पत्नीला सांगत होता- मी पोर्न नाही, इरॉटिक चित्रपट बनवले
क्राइम ब्रांचमधील सूत्रांच्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी संध्याकाळी शिल्पा शेट्टीला पोलिसांनी राज कुंद्रासमोर नेले. त्यावेळी कुंद्राला पाहताच शिल्पा भडकली. जोर-जोरात ओरडून ती कुंद्रावर आपला रोष व्यक्त करत होती. पोलिसांसमोरच तिने ओरडून सांगितले की "तुझ्यामुळे अख्ख्या कुटुंबाची इतकी बदनामी झाली. कित्येक प्रोजेक्ट्स माझ्या हातातून निघून गेले. तू मला तुझ्या उद्योगांबद्दल सांगायला हवे होते." यानंतर शिल्पाला अश्रू आवरले नाही. शिल्पा रडत असल्याचे पाहता राज कुंद्राने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याविरोधात असलेल्या खटल्यात काहीच नाही. उलट मी पोर्न बनललेले नाही. केवळ इरॉटिक चित्रपट बनवले आहेत असे कुंद्रा सांगत होता.

शिल्पाची पुन्हा चौकशी होणार की नाही यावर संभ्रम
मुंबई पोलिसांतील गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या पोर्न बिझनेसचा थेट संबंध दिसत नाही. तिने यात काही केल्याचे अजूनही दिसून आलेले नाही. त्यामुळे, तिची पुन्हा चौकशी करण्याची गरजही वाटत नाही. मात्र, याचा अर्थ शिल्पा शेट्टीला क्लीनचिट देण्यात आली असे मुळीच नाही. याच प्रकरणाचा तपास ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. तेव्हा मात्र, शिल्पाची चौकशी होऊ शकते असेही सांगण्यात येते. त्यामुळे, शिल्पाची पुन्हा चौकशी होणार आहे किंवा नाही यात अजुनही संभ्रम आहे.

काही बाबतीत कुंद्राची पार्टनर असल्याची कबुली
एकीकडे शिल्पा शेट्टी आपल्या पतीवर भडकली तर दुसरीकडे ती पतीला वाचवण्याचा देखील प्रयत्न करत आहे. शिल्पा शेट्टीने आपल्या जबाबात अश्लील चित्रपटांशी आपला संबंध नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या पतीवर सुद्धा चुकीचे आरोप केले जात असल्याचे तिने म्हटले आहे. शिल्पाने सांगितले, की ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रसिद्ध केला जाणारा कंटेन्ट खूप अश्लील असतो यात दुमत नाही. परंतु, कामूक चित्रपटांमध्ये आणि पॉर्नमध्ये खूप फरक आहे असेही तिने पोलिसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

शिल्पाने राजशी चर्चा केल्यानंतर आपल्या वकिलाला सोबत ठेवून पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामध्ये तिने वैयक्तिक आयुष्यासह बँक खात्यांवर सुद्धा माहिती दिली. राज कुंद्राच्या उद्योगांविषयी आपल्याला माहिती नाही. त्याच्या बिझनेसमध्ये ती केवळ नावाची पार्टनर होती. सगळे काम राज कुंद्रा करायचा आणि आपण चित्रपट आणि कार्यक्रमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असायचो असे शिल्पाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...