आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार सुनील राऊत यांची टीका:भोंग्यामुळेच शिंदे मुख्यमंत्री झालेत

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत नावाचा भोंगा चालू होता म्हणूनच महाविकास आघाडी झाली. आघाडी झाली म्हणून एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळाले. हे खाते मिळाले नसते आणि हा भोंगा बंद असता तर ते मुख्यमंत्री झाले नसते आणि चाळीस आमदारही त्यांच्यासोबत गेले नसते, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी मंगळवारी माध्यमांसमोर केली.

सुनील राऊत म्हणाले, आज जे चाळीस आमदार एकनाथ शिंदेंमागे गेले ते या चालू असलेल्या भोंग्यामुळेच गेले. ते काय सांगणार भोंगा बंद झाला. संजय राऊत ईडीला सामोरे गेले, ते दबावाला बळी पडले नाहीत. न जुमानता न घाबरता ते ईडीसमोर आहेत. संजय राऊतांनी अटक करून घेतली याचा अर्थ संजय राऊत कुठेही दबावाला बळी पडले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...