आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईत राहिला:शिंदे-फडणवीस सरकारला मराठी भाषेची अडचण निर्माण झालीय का?, अजित पवारांचा सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महाराष्ट्राची राजधानी असली तरी ती सहजासहज मिळाली नाही. त्यासाठी खूप लोकांनी बलिदान दिले. तेव्हा आपण 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्राचा यशस्वी कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला, मुंबई आणि मराठी माणसासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काम केले. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

काही लोकांना फोडण्याचे राजकारण झाले. अशाप्रकारचे राजकारण केल्याने संविधान राहणार आहे का? याचा विचार आपण केला पाहिजे, हे सरकार आल्यापासून निवडणुकांमध्ये जनतेने आपल्याला मत दिले आहे. या सरकारला मराठी भाषेची अडचण निर्माण झाली आहे का? हे देखो कुठले काढले? पाहा आपला महाराष्ट्र म्हणा ना. आता यांनाच पाहायची वेळ आली आहे, असा इशारा यावेळी अजित पवार यांनी दिला.

घोटाळा करुन मुख्यमंत्री

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, अलीकडील 6 महिन्यात मुख्यमंत्री कितीदा चुकले हे मी पाहिले. साडेतीनशे 50 मेट्रो लाईन टाकली असे एमपीएससी आणि निवडणूक आयोग यात घोटाळा केला. तसे घोटाळा करूनच ते मुख्यमंत्री झाले आहेत.

मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान द्रौपदी मूर्मू म्हणतात. देशाचे पंतप्रधान मुर्मू आहेत? मुंबईत साडेतीशने कोटी रेल्वे लाइन टाकले म्हणाले. तुम्हाला जमेत नसेल, तर नोट वाचून दाखवा. मागेही एमपीएसीत असाच घोटाळा करून टाकला. कारण ते घोटाळा करूनच मुख्यमंत्री झाले आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली.

महाराष्ट्राला नवा हिंद केसरी

अजित पवार म्हणाले की,जर 150 बैठका घेऊन सरकार पाडण्यात आले तर जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याचे काम आम्हाला करायचे आहे. खोट्या बातम्यावर लोकांनी विश्वास ठेऊ नये असेही अजित पवारांनी म्हटले आहे. मधल्या काळात दीडशे बैठका घेणारा नवा हिंद केसरी महाराष्ट्राला मिळाला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दीडशे बैठका घेतल्या. असे मी नाही, तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले. असे सरकार तुम्ही पाडायला लागला, तर देशात लोकशाही कशी राहणार. सत्ता येते आणि जाते. मात्र, जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.आपल्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका, यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे, याला बळी पडू नका असे अजित पवारांनी म्हटले आहे.