आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे-फडणवीस सरकार हे इव्हेंट आणि ईडीचे सरकार:सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, चिंतामणी राजाचे घेतले दर्शन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचे सरकार आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. मुंबई येथे चिंतामणी राजाचे दर्शन सुप्रिया सुळे यांनी घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

राज्यातील भाजप प्रणित शिंदे सरकार हे इव्हेंटबाज असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता सुळे म्हणाल्या, शिंदे-फडणवीस सरकार इव्हेंटबाज तर आहेच, पण त्यासोबतच हे सरकार ईडीचेही आहे.

यापूर्वीही इव्हेंटबाजीवरून सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. सुळे म्हणाल्या होत्या, 50 खोके ऑल ओकेवाल्या सरकारला सर्वसामान्यांची सेवा करण्याची इच्छा नाही. सध्या सरकारमधील लोक वेगवेगळ्या कार्यक्रमांतच व्यस्त आहेत. हे लोक कार्यक्रम सोडतील तेव्हा जनतेची सेवा करतील ना. हे सरकार सेलिब्रेशन करण्यात ऐवढे मग्न आहेत की, बस्ता बांधला, त्यानंतर लग्न केलं. मात्र हनिमून अजूनही सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस अजूनही 'नॉट ओके' अशा स्थितीत आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला होता.

रांगेतील वाद दुर्दैवी

दरम्यान, लालबाग राजाच्या दर्शन रांगेत सुरक्षा रक्षकांनी महिलांसोबत वाद घातल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच, यावरून एका मुलीने आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एक समाज म्हणून आपण याकडे लक्ष द्यायला हवे. तसेच, यापुढे अशा घटना घढू नयेत यासाठी खबरदारी बाळगायला हवी.

कोविडमध्ये डॉक्टरच्या रुपात बाप्पा

राज्यात दोन वर्षांनंतर गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन वर्ष कोविड असला तरी बाप्पा सर्वांच्या मनामध्ये विराजमान होते. त्यामुळे सार्वजनिक उत्सव साजरा करता आला नसला तरी मनातून, आपापल्या परीने, घरी बाप्पाचे सर्वांनी स्वागत केले. कोविड काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण कोविडवर मात करू शकलो. दोन वर्ष कदाचित डॉक्टरच्या रुपाने बाप्पा आपल्याकडे आले होते.

बातम्या आणखी आहेत...