आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गद्दारांचा पॅटर्न इतर राज्यात गेला तर देशात अस्थिरता:शिंदे - फडणवीस सरकार घटनाबाह्य; त्यांचा खरा चेहरा बाहेर येतोय - आदित्य ठाकरे

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे- फडणवीस सरकार घटनाबाह्य आहे, ते आता आरोप करीत आहेत. त्यांना आरोप करू द्या. त्यांचा खरा चेहरा बाहेर येत आहे. गद्दार गद्दारच असतात, गद्दारीचा पॅटर्न इतर राज्यात गेले तर देशात अस्थितरता येईल हे सरकार कोसळणार आहे, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. यांना एक दिवस जनतेसमोर यांना जावे लागेल उत्तरे द्यावेच लागणार आहे असेही त्यांनी सुनावले.

सावंतांना आरोप करू द्या

आदित्य ठाकरे म्हणाले, पुढचा एक महिना राजकीय सर्कस अशीच सुरू राहील. कुठेही राजकीय दौरा काढला नाही लोकांचे प्रेम घेण्यासाठी हा दौरा काढला आहे. लोक प्रेम देत आहेत. तानाजी सावंतांना आरोप करू द्या, विरोधकांना भ्रमात राहू द्या. आता या लोकांचे खरे चेहरे येत आहेत.

गद्दार गद्दारच असतात..

आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दारांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न पूरेपूर झाला. जे शिवसेना स्वतःला म्हणत होते, पण शिवसेनेला एकटे पाडण्याचा कट चाळीस गद्दार करीत होते. मात्र, आम्हाला जनता सांभाळून घेतील. आता यांचा खरा चेहरा बाहेर येत आहे. त्यांचे विचार लोकांसमोर येत आहेत. हे सरकार कोसळणार आहे. गद्दार गद्दारच असतात, गद्दारीचा पॅटर्न इतर राज्यात गेले तर देशात अस्थितरता येईल. जनतेसमोर यांना जावे लागेल उत्तरे द्यावेच लागणार आहेत.

सरकारच घटनाबाह्य

आदित्य ठाकरे म्हणाले, 33 दिवस झाले पण बेकायदेशिर सरकारला अजून मंत्रिमंडळ स्थापन करता आले नाही. जीआरचा धडाका या सरकारने लावला पण जिथे जिथे मी पर्यटनासाठी निधी दिला त्याला स्थगिती दिली गेली. नुकसान राज्याचे होत आहे, नवीन जीआर आणण्यासाठी सरकारच घटनाबाह्य आहे, सरकारचा शपथविधी बेकायदेशिर आहे. सरकार काळजीवाहू म्हणून ठिक पण बेकायदेशिर असल्याने काय बोलावे.

ते आमच्यावर खापर फोडतील

आदित्य ठाकरे म्हणाले, अयोध्येत महाराष्ट्र भवन व्हावे अशी भूमिका आहे. त्यावर स्थगिती या सरकारने दिली की, कार्य पुढे नेतात हे माहित नाही. अडीच वर्षांचे खापर हे आमच्यावर फोडतील. कुणाचा राग किती आहे हे ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...