आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा तर होणारच:मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली अंबानींच्या बाप्पांची भेट; दर्शनासाठी गाठले 'अँटिलिया'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • i

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने मोठ्या थाटात गणरायाचे स्वागत केले आहे. लाडक्या गणपती बाप्पाचे रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. आज अंबानीच्या घरातल्या बाप्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीसदेखील होत्या.

गणेशाच्या दर्शनानंतर मुकेश अंबानी हे मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांना सोडायला अँटिलियाच्या बाहेरच्या गेटपर्यंत आले होते. अंबानीच्या घरच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवास्थानी पोहचले. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ'वर गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. गणेश दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

तब्बल 45 मिनिटे चर्चा

गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. आज एकनाथ शिंदेनी राज यांची भेट घेतल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. राज आणि शिंदे यांच्यात तब्बल 45 मिनिटे चर्चा झाली. तर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना ही सदिच्छा भेट होती, असे सांगितले.

राज यांचा गणेशा, मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन
राज यांचा गणेशा, मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन
बातम्या आणखी आहेत...