आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकुश कदमांच्या वयापेक्षा जास्त पवारांचे कार्य:मराठा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची माथी भडकावण्याचे शिंदे सरकारकडून काम- महेश तपासे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा युवा सेनेच्या काही तरुण पदाधिकाऱ्यांची माथी भडकावण्याचे शिंदे - भाजप सरकारकडून काम केले जात आहे. आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करण्यासाठी प्रोत्साहन शिंदे सरकार देत आहे का असा प्रश्न तमाम तरुण संधटनेला राज्यात पडला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज केला. याबाबत त्यांनी एक व्हिडीओही जारी केला आहे.

त्यांच्या वयापेक्षा जास्त पवारांचे कार्य

महेश तपासे म्हणाले, अंकुश कदम हे मराठा युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात शरद पवारांनी मराठा तरुणांसाठी काय केले असा सवाल त्यांनी व्हिडीओद्वारे केला. त्यांच्या व्हिडीओचा आम्हाला राग आला नाही. परंतु अंकुश कदम यांचे जेवढे वय आहे त्यापेक्षा जास्त सामाजिक, राजकीय कारकीर्द शरद पवार यांची आहे.

सुप्रिया सुळेंचे मोठे कार्य

महेश तपासे म्हणाले, महाराष्ट्रात महिला धोरण असो, युवा, ज्येष्ठ नागरिक धोरण असो किंवा तृतीयपंथीयांच्या हिताला समाजात त्यांना योग्य ते स्थान देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेत समाजात आदरयुक्त स्थान त्यांना मिळेल यासाठी त्या काम करतात.

सातवेळा संसदरत्न पुरस्कार

महेश तपासे म्हणाले, सुप्रिया सुळे काम करतात म्हणून त्यांना सात - सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळतो. काम केले नसते तर पुरस्कार मिळाला नसता. किमान एवढे तरी अंकुश कदम यांना माहिती असायला हवे.

बातम्या आणखी आहेत...