आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटातील 8 मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्याची जबाबदारी:कोणत्या मंत्र्याकडे कोणते अतिरिक्त खाते?

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. मात्र, खातेवाटपात थेट कॅबिनेट मंत्र्यांचीच नाराजी समोर येऊ लागल्याने मुख्यमंत्री शिंदे यांची डोकेदुखी वाढली होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपात शिंदे गटाच्या तुलनेत भाजपला महत्त्वाची खाती मिळाल्याचे सूर उमटत होते. आता शिंदे गटातील 8 मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी या 8 मंत्र्यांवर देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी 9 अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मंत्रीमंडळ विस्तारानंतर केवळ 18 मंत्र्यांचेच खातेवाटप करण्यात आले. बाकीची उर्वरीत खाती ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राखून ठेवण्यात आली होती. आजपासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. अधिवेशन काळात विरोधक या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करु शकते. त्यामुळे अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच अतिरिक्त खात्याची जबाबदारी 8 मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.

मंत्रीसध्याचं खातंअतिरिक्त खातं
संदीपान भुमरेरोजगार हमी योजना व फलोत्पादनअल्पसंख्याक व औकाफ
दीपक केसरकरशालेय शिक्षण व मराठी भाषापर्यावरण आणि वातावरणीय बदल
अब्दुल सत्तारकृषीआपत्ती व्यवस्थापन
तानाजी सावंतसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमृद व जलसंधारण
संजय राठोडअन्न व औषध प्रशासनसामाजिक न्याय व विशेष सहाय्य
दादा भूसेबंदरे व खनिकर्मपणन
शंभूराज देसाईराज्य उत्पादन शुल्कपरिवहन
उदय सामंतउद्योगमाहिती आणि तंत्रज्ञान

विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना अधिवेशनात चर्चेचे आवाहन केले आहे. तर राज्यातील अतिवृष्टीने झालेले नुकसान, आधीच्या निर्णयांना दिलेली स्थगिती यावरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी संघर्षाची नांदी दिली. आज सकाळी मविआने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत 'ईडी' सरकार म्हणत जोरदार घोषणाबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...