आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाचा शिवसेनेवर आरोप:आ. सदा सरवणकर यांनी गोळीबार केलाच नाही, त्रास देण्यासाठीच बालिश आरोप

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभादेवीत शिंदे गट व ठाकरे गटात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार करत धमकावल्याचा आरोपही शिवसेनेने केले आहे.

यावर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेने केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. आमदार सदा सरवणकर यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत कायम 8 ते 9 पोलिस असतात, त्यावेळचे आम्ही रेकॉर्डिग पाहिले, मात्र त्यात कोणताही आवाज आलेला जाणवत नाही, असे पावसकरांनी म्हटले आहे.

काय म्हणाले पावसकर?

शिवसेनेकडून लावण्यात आलेला आरोप बालिशपणाचा आहे. आपण काही करु शकलो नाही, जे काही काम करत असतील त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, हा एकच उद्देश या आरोपातून दिसून आला आहे. स्वत:ला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आणि बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र म्हणवता आणि हिंदुच्या कार्यक्रमावर विरजन टाकतात या सर्व गोष्टीला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असे पावसकरांनी म्हटले आहे.

स्वत:च्या कार्यक्रमात फायरिंग करतील?

आमदार सदा सरवणकर यांनी जनतेसाठी व्यवस्था केली, विभागातील जनतेसाठी सर्व कामे केली, दादर, प्रभादेवीए परळ या भागातब मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासह सर्व सण आनंदात साजरा होत असतात. या साठी काम करणारा आमदार आपल्याच कार्यक्रमात फायरिंग करेल का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अडीच वर्षांत जे सण साजरे होऊ शकले नाही त्याचा आसनंद लोकांना मिळावा यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. सर्व कार्यक्रमातील रेकॉर्डिग बघा काही झाले नाही मग अटक का असा सवाल उपस्थित करत, जनतेला आनंद झाला म्हणून गुन्हा दाखल करत अटक करायची का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

चैन वापस करावी

हाणामारीनंतर शिवसैनिकांवर कलम 395 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर पावसकर म्हणाले, ज्या शाखाप्रमुखाची चैन हरवली ती जुन्या शिवसैनिकाला मिळाली आहे. ती त्याने वापस पोलिस ठाण्यात आणून द्यावी.

बातम्या आणखी आहेत...