आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार प्रतापराव जाधवांचे शिवसेनेवर जळजळीत भाष्य:म्हणाले, ''जशा निवडणुका जवळ येतील तसे त्यांचे घर रिकामे होईल!''

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जशा निवडणुका जवळ येतील तेव्हा त्यांचे घर रिकामे होईल! शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील उरलेल्या 15 आमदारांपैकी 8 आमदार शिंदे गटात येतील, असा दावा आज केला आहे.

बुलढाण्यातील खासदार प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते टीकेचे बाण सोडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील उरलेल्या 15 आमदारांपैकी आठ आमदार शिंदे गटात येतील, असा दावा त्यांचा आहे.

काय म्हणाले जाधव?

प्रतापराव जाधव म्हणाले, ठाकरे गटातील उर्वरित पाचपैकी तीन खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत येतील. अजूनही ठाकरे गटातील खासदार आणि आमदार आमच्याच संपर्कात आहेत. पण त्यांची मतदारसंघात स्थानिक पातळीवर वैयक्तिक अडटणी आहेत त्यामुळे ते थांबले आहेत.

त्यांचे नैतृत्वावर प्रेम नाही

ठाकरे गटात आमदार थांबले याचा अर्थ त्यांचा त्यांच्या नेतृत्वावर प्रेम आहे असे होत नाही. ठाकरे गटात ते आज जरी थांबलेले असतील तरीही ते ठाकरे गट सोडतील. निवडणुका जशा जवळ येतील तसे ठाकरे गटाचे घर रिकामे होईल.

शिंदेंची शिवसेना मजबूत

प्रतापराव जाधव यांनी दावा केला की, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात आले आहेत. आता एक एक करून बाकीचे येतील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना मजबुतीने पुढे येईल. निवडणुका येतील तेव्हा 15 पैकी किमान 7 ते 8 आमदार आणि पाचपैकी दोन ते तीन खासदार शिंदे गटात येतील.

विनायक राऊतांचा पलटवार

शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले, की, प्रतापराव जाधवांनी गद्दारी केली त्यांना इतरही आमदार गद्दारी करतील असे वाटत आहे.

बातम्या आणखी आहेत...