आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार दाखल होताच शितल म्हात्रेंची माघार:म्हणाल्या, सुप्रिया सुळेंचा फोटो व्हायरल झाला म्हणून ट्विट केला, सत्यता पोलिस पडताळतील

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट केला होता. मात्र, यावरुन तक्रार दाखल होताच शीतल म्हात्रे यांनी माघार घेतल्याचे दिसत आहे.

शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे, सुप्रिया सुळे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे मी तो ट्विट केला. मात्र, याची सत्यता सायबर पोलिस पडताळून पाहतील.

शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलेला फोटो.
शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलेला फोटो.

वरळी पोलिसांत तक्रार

शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करताच राष्ट्रवादी काँग्रेसने हा फोटो मॉर्फ असल्याचा आरोप केला. तसेच, याविरोधात वरळी पोलिस ठाण्यात म्हात्रेंविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. यानंतर शीतल म्हात्रे यांनीदेखील व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिले आहे.

सुप्रिया सुळेंच्या व्हायरल फोटोबाबत वरळी पोलिसांत दाखल झालेली तक्रार
सुप्रिया सुळेंच्या व्हायरल फोटोबाबत वरळी पोलिसांत दाखल झालेली तक्रार

वकिलांचा सल्ला घेणार

शीतल म्हात्रे म्हणाल्या, सुप्रिया सुळे यांच्या फोटोवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे समजले आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मी ट्विट केला होता. आता माझ्याविरोधात केस दाखल झाली आहे, तर सायबर पोलिस या फोटोची सत्यताही पडताळून बघेल. तसेच, यापुढे काय करायचे हे वकिलांचा सल्ला घेऊन ठरवेल, असेही म्हात्रे यांनी सांगितले.

श्रीकांत शिंदेंचा फोटो मॉर्फ केला

राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा फोटो मॉर्फ केला, असा आरोपही आज शीतल म्हात्रे यांनी केला. शीतल म्हात्रे म्हणाल्या, खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो मॉर्फ करुन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. तसेच, या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला. यावर प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, असेही म्हात्रे म्हणाल्या.

महाराष्ट्रात खुर्चीचा किस्सा पेटला:सुप्रिया मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंकडून ट्विट; NCPची सायबर सेलकडे तक्रार