आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंना मुंबईत आव्हान देण्याची तयारी:शिंदे गट दादरमध्येच नवे शिवसेना भवन उभारणार; आमदार सदा सरवणकर यांची माहिती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरेंना मुंबईत आव्हान देण्यासाठी शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. दादरमध्ये नवे शिवसेना भवन उभारण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. सदा सरवणकर म्हणाले मुंबईत ठाकरे गटाचे वर्चस्व आहे, असा एक आभास तयार करण्यात आला आहे. मुंबईतल्या जनतेचे, शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामे झाली नाहीत. एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नाही. असा आरोप सदा सरवणकर यांनी केला आहे.

काय म्हणाले सरवणकर?

सदा सरवणकर म्हणाले की शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आम्ही नव्या शाखा उभारणार असून प्रत्येक विभागात नवे कार्यालय तयार करण्यात येणार आहे. शिंदेंच्या कामाची गती पाहता मुंबईत नव्या कार्यालयाची गरज आहे. यासाठी आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जाणार असून शाखाप्रमुखांची घोषणा होईल. असेही सदा सरवणकर यांनी म्हटले आहे. तर या मुख्य कार्यालयांच्या आदेशावर इतर विभागीय कार्यालयातील कामे चालतील असेही त्यांनी सांगितले आहे.

किशोरी पेडणेकरांची टीका?
आमदार सदा सरवणकर यांच्या घोषणेनंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सदा सरवणकर यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. दलबदलू नेत्यांना काय उत्तर द्यायचे, ते उद्या दुसऱ्या पक्षात जातील असा टोला त्यांनी लगावला आहे.

शिवसेना भवनाचा इतिहास

शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. तर सामना प्रबोधन ट्रस्टची मालमत्ता आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जी व्यवस्था करून ठेवलीय त्यानुसार हे चालते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. शिवसेना 1966 मध्ये जन्माला आली, त्यानंतर पक्ष जसजसा वाढत गेला. तेव्हा शिवसेना पक्ष कार्यालयाची उणीव भासू लागली. 1974 मध्ये पहिल्यांदा शिवसेना भवन उभारले गेले. ही जागा उमरभाई नावाच्या मुस्लीम माणसाची होती. व्यवहार करून ही जागा शिवाई ट्रस्टला देण्यात आली

बातम्या आणखी आहेत...