आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा टिझर रिलीज:बाळासाहेबांसह आनंद दिघेंचे फोटो, शिवसेनेचे नावही वापरले; ठाकरे-शिंदे गटात पोस्टर वाॅर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करणारे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात पोस्टर वाॅर रंगत आहे. यातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे टिझरचे प्रमोशन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिझर ट्विट करूनच ही माहिती दिली.

दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरू होता. कुणाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार हा प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडला. प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेले. अखेर न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरेंचीच बाजू जमेची ठरली. त्यामुळे शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार हे निश्चित झाले. आता शिंदे गटही दसरा मेळावा जोरदार करण्यासाठी जय्यत तयारी करीत आहे. त्याचाच भाग म्हणजे त्यांच्याकडून एक टिझर प्रसारित करण्यात आले आहे.

सीएम शिंदे यांचे ट्विट

काय आहे टिझरमध्ये?

जय हिंद जय महाराष्ट्र आणि वंदे मातरम् ने टिझरला सुरुवात झाली. शिवसेना, भगवा झेंडा आणि हिंदु धर्म असा उल्लेखही यात आहे. विशेषतः बीकेसीवर होणारा दसरा मेळावा हा शिवसेनेचाच असल्याचे टिझरमध्ये सांगण्यात आले आहे.

शिंदे-ठाकरे गटात पोस्टर वाॅरही

ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन होणार हे निश्चितच आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची दोन पोस्टर्स जारी करण्यात आली आहेत. एका पोस्टरवर 'आम्ही विचारांचे वारसदार' तर दुसऱ्या पोस्टरवर 'हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार' असा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो आहे. 'शिवसेनेचा दसरा मेळावा' असाही उल्लेख करत धनुष्यबाण चिन्ह छापण्यात आले.

​​​​​​ठाकरे गटाकडून काऊंटर अ‌ॅटॅक

ठाकरे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी पोस्टर जारी झाले. यात 'काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा हा वारसा संघर्षाचा आहे' अशा पद्धतीचे पोस्टर मातोश्री परिसरात लावण्यात आले. 'वाजतगाजत गुलाल उधळत शिस्तीने या चला शिवतीर्थावर' असे आधीच उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...