आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंचे संकटमोचक नार्वेकर शिंदे गटात जाणार का ?:मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले, आज माझा मूड वेगळा, काहीही लपवून ठेवत नाही...!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उजवा हात मानले जाणारे मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्टच सांगून टाकले.

शिंदे सरकारमधील डॅशिंग मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असल्याचा दावा केला आणि चर्चेची एकच राळ उडाली. आता या बहुचर्चित दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मौन सोडले आहे.

'त्यांचे' मधुर संबंध

नार्वेकर आणि शिंदे यांचे संबंध शिवसेनेतल्या बंडानंतरही मधुर आहेत. विशेष म्हणजे शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याशी शिष्टाई करायला उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांनाच पाठवले होते. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवादरम्यानही शिंदे यांनी नार्वेकरांच्या घरी हजेरी लावली होती. त्यामुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा नार्वेकर शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.

काय म्हणाले गुलाबराव?

मिलिंद नार्वेकरांबद्दल बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, तुम्ही खोके घेतले म्हणता, पण आयुष्यभर बाळासाहेबांची सेवा करणारा चंपासिंह थापाने काय केले? त्यांनी बाळासाहेबांच्या चरणी संपूर्ण आयुष्य घालवले, ते देखील उद्धव ठाकरेंना सोडून आमच्यासोबत आले आहेत. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत. गुलाबरावांच्या या वक्त्यावर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

गुलाबरावांच्या वक्तव्याची चर्चा मोठ्या चवीने केली जातेय. यावर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पनवेल येथे बोलताना मौन सोडले. यावेळी शिंदे म्हणाले की, नार्वेकर आमच्याकडे येणार की, नाही माहीत नाही. मात्र, आज माझा वेगळा मूड आहे. मी काहीही लपवून ठेवत नाही. माझे जे आहे, ते सगळे उघडे आहे, असे सांगून त्यांनी या विषयाला बगल दिली. त्यामुळे नार्वेकर शिंदे गटात जाणार का, यावरून अजूनही चर्चा सुरूच आहे.

बातम्या आणखी आहेत...