आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये स्वराज्यभूमी कोकण महोत्सव उद्घाटनपर कार्यक्रमात चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख “महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री’ म्हणून केला. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. दरम्यान, या कार्यक्रमात शिंदे यांना आपण काय चूक केली हेदेखील उमजले नाही. त्यानंतर त्यांनी आपले सहकारी मंत्री दीपक केसरकर यांना आपण काही चूक तर नाही बोललो नाही ना, अशी विचारणाही केली.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, संजय शिरसाट आणि भाजपमधील अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या उद्घाटनपर भाषणापेक्षाही त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या उल्लेखाची जास्त चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.
कोकणीतून भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणाची सुरुवात कोकणी भाषेत बोलून केली. “कसा काय असात तुम्ही? कोकण महोत्सवाक हजर ऱ्हाऊक मका आनंद झालो असा”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “केसरकरांना मघाशी मी विचारून घेतलं की यात मी काही चुकीचं नाही ना बोलत! नाहीतर सगळे लोक दुर्बिण लावून बसलेले असतात”, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.