आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण:नारायण राणे येऊन गेल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण, फोटोला घातला दुधाने अभिषेक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुपारी नारायण राणे यांनी स्मृतीस्थळावर आले होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आज आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होत वंदन केले. मात्र यानंतर आता संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करण्यात आले.

नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी यांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्र शिंपडून, दुधाचा अभिषेक शिवसैनिकांनी घातला. दुपारी नारायण राणे यांनी स्मृतीस्थळावर आले होते. त्यामुळे हा परिसर अशुद्ध झाला असल्याचे शिवसैनिक म्हणाले आहेत. त्यामुळे आता राज्यात नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी शुद्धीकरण केले.

काय म्हणाले आप्पा पाटील...
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केल्यानंतर आप्पा पाटील म्हणाले की, 'आज ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केले आहे. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक घातला. यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुले तिथे वाहण्यात आली. तसेच नारायण राणेंविषयी बोलताना ते म्हणाले की, त्यांना आज शिवसेना दिसली. एवढ्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते. तसेच देशाच्या टॉप पाचमध्ये असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते काहीही बोलत होते. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकणार नाही. याच कारणामुळे आम्ही हे शुद्धीकरण केले आहे'.

बातम्या आणखी आहेत...