आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली विमानतळावरील अदानी नामफलकाची तोडफोड; शिवसेनेचा या नामफलकाला विरोध

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमानतळाचा सध्या अदानी समुहाकडे ताबा

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानी नामफलकावरुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला आहे. विमानतळावरील या नामफलकाला विरोध करत त्याची तोडफोड करण्यात आली आहे. अदानी समुहाने गेल्या काही दिवसापूर्वी या विमानतळाचा ताबा घेतला आहे. त्यांनी मुख्य प्रवेशव्दारावर 'अदानी एअरपोर्ट' असे नामफलक लावले आहे.

शिवसेनेचा या नामफलकाला विरोध असून या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असताना हे फलक का लावले? अशी विचारणा शिवसैनिकांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावरील या नामफलकाची तोडफोड केली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर येथील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

नामफलकाची तोडफोड करताना शिवसेनेचे कार्यकर्ते...
नामफलकाची तोडफोड करताना शिवसेनेचे कार्यकर्ते...

विमानतळाचा सध्या अदानी समुहाकडे ताबा
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा 13 जुलै रोजी अदानी समुहाकडे आला आहे. यापूर्वी हा ताबा जीव्हीके कंपनीकडे होता. अदानी समुहाकडे हा ताबा येताच त्यांनी विमानतळावरील दोन्ही ठिकाणी हे फलक लावले आहे. या नामफलकावर शिवसेनेकडून वारंवार तक्रार करण्यात येत होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर काही दिवसापूर्वी टिप्पणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...