आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून शुक्रवारी राज्यभर मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांकडून जागोजागी निदर्शने करण्यात आली. कुठे दुचाकीची अंत्ययात्रा तर कुठे बैलगाडी मोर्चा काढून मोदी सरकारचा शिवसैनिकांनी निषेध केला.
मुंबईतील दादर, गिरगाव, भायखळा, वडाळा, वांद्रे या भागात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी आंदोलनात भाग घेतला. भायखळा येथे महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैलगाडीत बसून आंदोलन केले. परिवहनमंत्री अनिल परब यांनी वांद्रे येथे, गोरेगाव रेल्वेस्थानकाबाहेर खासदार गजानन कीर्तिकरयांनी आंदोलन केले.
नाशिक, पंढरपुरातही आंदोलन : पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला. वाढीचा निषेध केला. सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नगर, कोल्हापूर, सोलापुरात आंदोलन करण्यात आले.
मनमानी मान्य नाही : परब
मुस्कटदाबी होते तेव्हा शिवसेना उफाळून उठते. शिवसेना केंद्राची मनमानी मान्य करणार नाही. आजचे आंदोलन आमचा इशारा मोर्चा आहे. शिवसेनेची यापुढची आंदोलने अजून तीव्र होतील, असा इशारा शिवसेना नेते व राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला. तसेच केंद्राने इंधन दर कमी केल्यास राज्य सरकार इतर कर हटवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भाजपचे टाळे ठोको आंदोलन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीज बिलावरून राज्यात ठाकरे सरकारविरोधात भाजपने शुक्रवारी टाळे ठोको आंदोलन केले. राज्यातील वीज केंद्रांबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा करत आघाडी सरकारविरोधात नारेबाजी केली. कोरोनाच्या कठीण काळातसुद्धा आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला दुप्पट तिप्पट वीज बिल पाठवून आता वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देणाऱ्या ठाकरे सरकारचा या वेळी निषेध करण्यात आला.
कांदिवलीत आंदोलन : भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि योगेश क्षीरसागर यांनी कांदिवली (प.) येथील अदानी कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांसह जोरदार आंदोलन केले. या वेळी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी झाली.
या शहरात नाेंदवला निषेध
वाढीव वीज बिलावरून राज्यात, औरंगाबाद, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोला,अमरावती, बुलडाणा, नाशिक, जळगाव, चाळीसगाव, धुळे, सोलापूर, पंढरपूर, वाशीम या शहरांत वीज कार्यालयाबाहेर वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. या वेळी राज्यातील महाविकास आघाडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.