आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते आपल्या कुटुंबासह दुबईला फिरायला गेले होते. दुबईतच काल संध्याकाळी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. ते 52 वर्षांचे होते.
रमेश लटके यांच्या निधनाचे वृत्त येताच त्यांच्या अंधेरी येथील कार्यालयासमोर समर्थकांनी गर्दी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी लटके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. माझ्या सहकाऱ्याच्या निधनाची बातमी दु:खदायक आहे. अंधेरी (पूर्व) मतदासंघांत त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.
रमेश लटके यांचा राजकीय प्रवास
- 1997 साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
- त्यानंतर 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीतही विजयी.
- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्वमधून निवडून आले.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही याच मतदारसंघात पुन्हा विजयी.
- अंधेरीमध्ये रमेश लटके यांची मजबूत पकड होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.