आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकारण:सुशांत प्रकरणात दिलासा अन् हाथरसचा मुद्दा हाती लागल्याने शिवसेनेचा भाजपवर हल्ला; राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्याकडे शिवसेना नेत्यांची तक्रार

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अथवा ठाकरे कुटुंबीयांतील इतरांचे हाथरस किंवा सुशांतच्या ‘एम्स’ अहवालावर अद्याप मौन

हाथरस अत्याचार त्यापाठोपाठ अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात ‘एम्स’च्या अहवालामुळे मिळालेला दिलासा यामुळे गेले तीन महिने बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेने आता पुन्हा भाजपवर आक्रमकपणे हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने राष्ट्रपती, गृहमंत्री यांना पत्रे पाठवून योगी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचसोबतच शिवसेनेच्या मुखपत्रातूनही रविवारी भाजपवर सडकून टीका करण्यात आली. त्यामुळे आता महाराष्ट्रातही भाजप बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहेत. मात्र,

हाथरस अत्याचार त्यापाठोपाठ अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात ‘एम्स’च्या अहवालामुळे मिळालेला दिलासा यामुळे गेले तीन महिने बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेने आता पुन्हा भाजपवर आक्रमकपणे हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने राष्ट्रपती, गृहमंत्री यांना पत्रे पाठवून योगी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचसोबतच शिवसेनेच्या मुखपत्रातूनही रविवारी भाजपवर सडकून टीका करण्यात आली. त्यामुळे आता महाराष्ट्रातही भाजप बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अथवा ठाकरे कुटुंबीयांतील कुणीही हाथरस किंवा सुशांतच्या ‘एम्स’ अहवालावर अद्याप भाष्य केलेले नाही हे विशेष.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत आली म्हणून अनेक भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. आता शिवसेनेने तोच कित्ता गिरवला आहे. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राष्ट्रपती यांना रविवारी पत्र लिहिले आहे. हाथरस पीडिताच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश प्रशासनाचे अधिकारी धमकावत आहेत. पीडित कुटुंबियांना कुणाला भेटू दिले जात नाही, माध्यमांशी बोलू दिले जात नाही. या कुटुंबियांना आपल्या मुलीवर अंत्यसंस्कारसुद्धा करु दिले नाहीत, असे म्हणत चतुर्वेदी यांनी पिडीत कुटुंबियांना केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती व सेना नेत्या डाॅ. निलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे. हाथरस घटनेत ज्या अधिकाऱ्यांकडून दिरंगाई झाली त्यांच्यावरती कारवाईच्या व्हावी. एक महिन्याच्या आत या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश येथील लोकप्रतिनिधी सुरेंद्र सिंह आणि रणजित श्रीवास्तव यांनी या घटनेवरून महिलांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून बदनामी केल्याबाबत कारवाई करण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. त्यापाठोपाठ ‘मुंबईत एका नटीचे बेकायदेशीर बांधलेले ऑफिस तोडले म्हणून ज्यांना महिलांवरील अत्याचाराच्या उचक्या लागल्या. मात्र पीडितेला न्याय मिळावा म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. एका नटीसाठी एक कायदा आणि एका बेटीचा देह मात्र विटंबना करून जाळला जातो, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या मुखपत्रात भाजप आणि योगी सरकारवर सडकून टीका केली आहे.

मराठी भैया कुठे ?

काँग्रेसचे नेते सातत्याने हाथरसप्रकरणी भाजप व मुख्यमंत्री योगी यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. सत्ताधारी आघाडीतील मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुशांतसिंह प्रकरणी ओरडणारे ‘मराठी भैया’ कुठे आहेत, अशी खोचक विचारणा केली आहे.

दूरचित्रवाहिन्यांवरील भाजप नेते ‘म्यूट ’

प्रदेश भाजपच्या आघाडीवर सर्वत्र सामसूम आहे. दूरचित्रवाहिन्यांवर नेहमी दिसणारे भाजप नेते (म्यूट) मूक झाले आहेत. घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांनी एकट्याने किल्ला लढवला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारकडे ६५ दिवस तपास होता. अमली पदार्थ संदर्भातील व्हाॅटसअॅप चॅट उपलब्ध असताना सरकारने दुर्लक्ष का केले ? अशी विचारणा केली आहे.

हे विशेष.