आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅनरबाजी:'संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांनाच शिवसैनिक म्हणतात'; अनिल परबांच्या समर्थनासाठी शिवसैनिक पुढे सरसावले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपने अनिल परब यांना टार्गेट केलं असून त्यांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तसंच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे राणे यांना अटक होण्यामागे अनिल परब असल्याचं बोलले जात आहे. त्यानंतर राणेंनी परब यांची सर्व प्रकरणं उकरुन काढणार असल्याचा इशारा दिला.

दरम्यान, आता शिवसैनिक अनिल परब यांच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत. साहेब आम्ही तुमच्या सदैव सोबत आहोत, अशा आशयाचे बॅनर्स लावले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोगेश्वरीमध्ये हे बॅनर लावले आहेत.

या बॅनरवर "संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांनाच शिवसैनिक म्हणतात. अनिल परब साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.''असं लिहिण्यात आलं आहे.

बातम्या आणखी आहेत...