आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आणि शिंदे गटात वाद:शिवसेना-भाजपत वरळीत पोस्टर वॉर; एकमेकांच्या पोस्टरची फाडाफाडी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अादित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्ये सध्या पोस्टर वाॅर जोरात सुरू आहे. भाजपचे बॅनर्स शिवसैनिकांनी फाडल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर प्रथम भाजपने आमचे बॅनर हटवले, असा पवित्रा सेनेने घेतला आहे. मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा वाद फलकाच्या फाडाफाडीवरून सुरू आहे.

शिवसेनेचे पोस्टर बंडखोर शिंदे गटाच्या समर्थकांनी काढल्याचे युवा सैनिकांचे म्हणणे आहे. याचा वचपा काढण्यासाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वरळीतील भाजपचे पोस्टर फाडले. याचा परिणाम म्हणून वरळीत राजकीय वातावरण तापले आहे. यंदा गणेशोत्सवात राजकीय बॅनरबाजीची स्पर्धा जोरात सुरू आहे. त्यातच नवख्या बंडखोर शिंदे गटाची त्यात भर पडली आहे.

बातम्या आणखी आहेत...