आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणा Vs शिवसेना:'लीलावती'विरोधात शिवसेनेची वांद्रे पोलिसांत तक्रार, MRI कक्षातील राणांच्या फोटोंवर आक्षेप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून वांद्रेमधील हिल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांचे एमआरआय सुरू असताना फोटो कसे काढले यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातील एमआरआय कक्षातील फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शिवसेनेनेही हा मुद्दा लावून धरत लीलावती रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यामुळे रुग्णालय प्रशासनाचीदेखील डोकेदुखी वाढली आहे.

फोटो कुणी काढले?
नवनीत राणा यांचा खरच एमआरआय झाला आहे का?, एमआरआय करताना व्हीडीओ शुटींग आणि फोटो कसे काढले गेले? असे प्रश्न शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपस्थित केले आहेत. नवनीत राणा यांचा एमआरआय करतानाचा फोटो मनीषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना दाखवला. एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याला परवानगी नसताना रुमपर्यंत कॅमेरा गेलाच कसा, असा सवाल पेडणेकर आणि कायंदे यांनी लिलावतीच्या अधिकाऱ्यांना केला आहे. तसेच, तो फोटो कुणी काढला, याबाबतही खुलासा करावा, अशी ताकिद दिली आहे. तसेच एमआरआय सुरू असताना स्टाफही दूर असतो. स्पीकरवर सूचना दिल्या जातात. असं असताना दरवाजा उघडा ठेवणं, फोटो काढण्यास परवानगी देणं हे सर्व गंभीर आहे, असे ते म्हणाले.

काय प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. नवनीत राणांची भायखळा कारागृहातून 5 मे रोजी 12 व्या दिवशी सुटका झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना संध्याकाळी 5 ऐवजी दुपारीच सोडण्यात आले होते.

कारागृहातुन बाहेर आल्या नंतर नवनीत राणा घरी न जाता थेट लीलावती रुग्णालयात भरती झाल्या. छाती, मान आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना तसेच स्पॉन्डिलायटिसचा त्रास होत असल्याने त्यांचे एमआरआय स्कॅन आणि संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे. मात्र, यावेळी रूग्णालयात त्यांच्या एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना झालेली व्हिडीओ शुटींग समोर आले. एमआयआर कक्षात छायाचित्र काढण्यात आल्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना आमदार मनीषा कायंदे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाला फैलावर घेतले.

बातम्या आणखी आहेत...