आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:ईडी कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा नाही, शिवसेना नेते संजय राऊत यांचा खुलासा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीच्या नोटिसीसंदर्भात शिवसैनिकांची अस्वस्थता मी समजू शकतो. मात्र सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) विरोधात शिवसैनिकांच्या वतीने मोर्चा काढले जाणार नाही. यासंदर्भात माध्यमात आलेले वृत चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी स्पष्ट आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा या ईडी कार्यालयात मंगळवारी (दि.५) चौकशीला सामोरे जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, मोर्चाच्या बातम्या चुकीच्या आहेत.

रस्त्यावर उतरायचे तेव्हा उतरू. पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला शिवसेनेची शक्ती पाठीशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. तशा चर्चांना उधाण आले होते.

पाच जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची चर्चा होती. मात्र या सर्व चर्चांना संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत ब्रेक लावला आहे. संजय राऊत यांंच्या पत्नीने दहा वर्षापूर्वी निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून ५५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्याप्रकरणी वर्षा संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. प्रवीण राऊत हा पीएमसी बँक कर्ज घोटाळ्यातील आरोपी आहे. त्याची ७२ काेटींची मालमत्ता ईडीने नुकतीच जप्त केली आहे.

घरातली उणीदुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा
भाजप आमदार नितेश राणे यांनी समाजमाध्यमावर आज शिवसेनेला लक्ष्य केले. ‘शिवसेना ईडी कार्यालयाबाहेर मोर्चा काढणार म्हणे. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी निघाला नाही. हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही. हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही. पण वैयक्तिक घरातली उणीदुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म ?”अशी खोचक टीका राणे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...