आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनुष्यबाणावर पुढची सुनावणी 30 जानेवारीला:लेखी उत्तर द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाचे ठाकरे- शिंदे गटाला निर्देश

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला? यावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात आज एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाची घमासान लढाई झाली. आज दोन्ही गटाची बाजू ऐकल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काही म्हणणे असेल तर लेखी उत्तर द्या असे निर्देश दोन्ही गटाला दिले. तसेच पक्षचिन्हावरील पुढील सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे.

पक्षचिन्ह वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात आजची महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. दोन्ही गटाच्या वकीलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून यानंतर निवडणूक आयुक्तांनी अधिकाऱ्यांची काहीवेळ चर्चा केली.

शिंदे गटाचे सर्व मुद्दे खोडले - परब

अनिल परब म्हणाले, कपिल सिब्बल व देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे सर्व मुद्दे खोडून काढले. सविस्तर खुलासा दोन्ही वकीलांनी केला. सादीक अली यांच्या केससारखी येथे परिस्थिती नाही. पक्ष कार्यकारिणीचे सदस्यांचे बहुमत उद्धव ठाकरेंकडे आहे. त्यामुळे येथे सादीक अली केस लागू पडत नाही. धनुष्यबाण व पक्षाचे चिन्ह आम्हालाच मिळेल. तीस जानेवारीपर्यंत रिटन सबमिशन करायचे आहे.

ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद

ठाकरे गटाकडून जवळपास 1 तास 10 मिनीटे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ते केंद्रीय निवडणूक आयोगातून निघून गेले. तर देवदत्त कामत यांनी सुमारे 1 तास 25 मिनिटे युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांचा सुमारे 10 मिनीटे युक्तिवाद केला.

जेठमलानींना मुद्दे मांडताना आयोगाने थांबवले

ठाकरे गटातर्फे आज कपिल सिब्बल यांनी सुमारे एक तास दहा मिनिटे युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे महेश जेठमलानी यांना युक्तिवाद करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. ठाकरे गटाचा पूर्ण युक्तिवाद होऊ द्या त्यानंतर युक्तिवाद करावा असे सुचित केल्यानंतर सिब्बल यांच्यानंतर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी आज सुमारे 1 तास 25 मिनिटे युक्तिवाद केला. त्यानंतर महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद केला.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींचा युक्तिवाद सुरू

 • शिवसेना पक्षाच्या घटनेचे आम्ही पालन केले - महेश जेठमलानी
 • शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत फूट. मुख्यनेतापद कायदेशीर.
 • लोकसभा, विधानसभा सदस्यसंख्या बघता चिन्ह आम्हालाच द्या.
 • प्रतिनिधी सभा नव्हे लोकप्रतिनिधी महत्वाचे.

शिंदे गटाकडून मनिंदरसिंग यांचा युक्तिवाद काही वेळ झाला.

शिवसेना कुणाची हे सर्वांना माहीत - आदित्य ठाकरे

सर्वांना माहीत आहे की, शिवसेना कुणाची आहे. जे गेले ते गद्दार आहे. मुंबईतील रस्त्याचे टेंडरबाबत मी बोलतोय. ते टेंडर 48 टक्के हाईकवर गेले आहे. निगोशेशनला कुणी काॅन्ट्र्क्टर आले नाहीत. आम्ही मागणी केल्यानंतर मुंबईचे साडेचारशे कोटी रुपये आम्ही वाचवू शकलो आहे.

कामत - जेठमलानी यांच्यात खडाजंगी

युक्तिवाद सुरू असताना कामत यांना महेश जेठमलानी यांनी प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? प्रश्न विचारला. यादरम्यान ठाकरे गटाचे वकील कामत आणि महेश जेठमलानी यांच्यात निवडणूक आयोगासमोरच वाद झाला. कामत यांच्या प्रतिनिधी सभेच्या युक्तिवादावरुन महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. यानंतर निवडणूक आयुक्तांनी मध्यस्ती केली व देवदत्त कामत यांचा युक्तिवाद पूर्ण ऐकून घेऊ असे आयोगाने म्हटले.

मी माझ्या पद्धतीनेच बोलणार - कामत

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्या युक्तिवादातील मुद्द्यांवर आक्षेप घेतला व याचिकेत जेवढे आहे तेवढे बोला असे म्हणाले. त्यावर देवदत्त कामत म्हणाले की, मी माझ्या पद्धतीनेच बोलणार असे देवदत्त कामत यांनी त्यांना स्पष्ट सांगितले.

शिंदे गटाचे राहुल शेवाळे आयोगात दाखल

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. दीड तासांपासून सुनावणी सुरू असताना राहुल शेवाळे हे सुनावणीच्या अंतीम टप्प्यात केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल झाले आहेत.

ठाकरे गटाचा युक्तिवाद (कपिल सिब्बल यांनी आज ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला.)

 • शिवसेनेची (ठाकरे गट) घटना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर वाचून दाखवली.
 • शिवसेनेची घटना कायदेशीर नाही, असे शिंदे गट कोणत्या आधारावर ते सांगत आहेत?
 • शिवसेनेची घटनाच शिंदे गटाला मान्य नाही तर एकनाथ शिंदेंनी पक्षाचे नेतेपद घेतले ते कोणत्या आधारावर घेतले.
 • उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून कार्यकार 23 जानेवारीला संपतो, प्रतिनिधी सभा घेण्याची आम्हाला परवानगी द्यावी. सिब्बल यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
 • नेता निवडीसाठी आणि प्रतिनिधी सभा घेण्याची मुभा द्यावी यासाठी ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात दोन अर्ज दाखल केले आहेत.
 • राष्ट्रीय कार्यकारणी आमच्यासोबत आहेत. कपिल सिब्बल यांचा आयोगासमोर युक्तिवाद
 • शिंदे गटाने नेमलेली राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर.
 • पक्षप्रमुखांची निवड राष्ट्रीय कार्यकारिणीत होऊ शकते.
 • ठाकरे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही बरखास्त होऊ शकत नाही. ती घटनेप्रमाणे आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणेच सर्व प्रक्रीया पार पाडल्या.
 • घटना निवडणूक आयोगासमोर सादर करुन सिब्बल यांच्याकडून आयोगासमोर जोरदार युक्तिवाद.
 • राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या ठाकरे गटाची कपिल सिब्बलांमार्फत आयोगासमोर मागणी
 • शिदेंची प्रतिज्ञापत्र तपासून पाहा - सिब्बलांचा आक्षेप
 • राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या, त्यामुळे पक्षप्रमुखाची मुदत वाढेल.
 • शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता आहे. 61 जिल्हाप्रमुखांच्या प्रतिज्ञापत्रात 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्रच नाहीत.
 • शिवसेना पक्षात फूट नाही. पक्षाच्या सभेला उपस्थिती न लावता ते गुवाहटीला का गेले? लोकशाहीनुसार, शिंदे गटाने म्हणणे मांडायला हवे होते.
 • पक्षाने बोलवलेल्या सभेला शिंदे गटाचे नेते उपस्थित नव्हते.
 • शिंदे गट राजकीय पक्ष नाही, पक्षाबद्दलची सर्व बाबींची पूर्तता आमच्याकडून झाली - ठाकरे गटच खरी शिवसेना.
 • शिंदे गटाची कार्यपद्धती ही संसदीय लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही सादर केलेली सर्व कागदपत्र योग्य आहे.
 • शिंदे गट शिवसेनचा भागच नाही. प्रतिनिधी सभा पक्षच चालवतो. प्रतिनिधी सभा आमच्याबाजूने. पक्ष सोडून गेलेले सदस्य सभेचा भाग होऊ शकत नाहीत.
 • एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत कार्यरत होते. पदावरही होते मग शिवसेना बोगस कसे म्हणू शकतात?
 • आयोगाचा कपिल सिब्बल यांना प्रश्न - अजून कितीवेळ युक्तिवाद चालणार?
 • कपिल सिब्बलांचे उत्तर - अनेक मुद्दे अजूनही मला मांडायचे आहेत.

ठाकरे गटातर्फे आज केंद्रीय निवडणूक आयोगात देवदत्त कामत हे युक्तिवाद करीत आहेत.

 • मुळ पक्ष ठाकरेंसोबत आहे. शिंदे शिवसेनेत होते. शिवसेना बोगस कशी म्हणू शकतात. - देवदत्त कामत
 • राजकीय पक्ष म्हणून आमचे संख्याबळ विचारात घ्या. शिंदे गटाकडे जरी आमदारांची संख्या जास्त असली तरी मुळ पक्ष आम्ही आहोत.
 • सादीक अली केस या केससंदर्भात लागू होत नाही.
 • शिंदे गट राजकीय पक्षच नाही. पक्षाबाबतची सर्व पूर्तता आम्ही पूर्ण केलेली आहे.
 • शिंदे गटाचे मुख्यनेतापद हेच बेकायदेशीर आहे.
 • शिंदे गटाकडे जरी लोकप्रतिनिधींची संख्या जास्त असली तरी संघटनात्मक संख्याबळ ठाकरे गटाकडे जास्त
 • प्रतिनिधी सभा आमच्यासोबत. शिंदेंच्या मुख्यनेतापदाची तरतूद शिवसेनेच्या घटनेतच नाही.
 • प्रतिनिधी सभा अंतीम निर्णय घेऊ शकते. शिंदे गटाला प्रतिनिधी सभेचे कोणतेही अधिकार देऊ नये. प्रतिनिधी सभेचे बहुमत ठाकरेंच्या बाजूने आहे. ठाकरे गटाने सर्व कागदपत्रे ठाकरे गटाने वारंवार आयोगाकडे दिले आहेत.
 • पक्षाची घटना कायदेशीर आहे. पक्षात असताना आमदार हे ए.बी. फार्मवर निवडून आले आहेत. नंतर नियम का लागू होत नाहीत.

कपिल सिब्बल हजर

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल थोड्याच वेळापूर्वी निवडणूक आयोगात हजर झालेत. त्यामुळे या प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. आज निवडणूक आयोग निकाल देणार की, सुनावणीची तारीख पुढची तारीख मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

फूट पडलीच नाही, ठाकरेंचा दावा

धनुष्यबाण कुणाचा?, या वादावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नाही. तसेच, सध्या दाखवण्यात येणारे चित्र कपोलकल्पित असल्याचा दावा केला. शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असून या सर्वांची ओळखपरेड घ्या, तरच सत्यता समोर येईल, असेही आयोगाला सांगितले. त्यामुळे आयोग यावर आज काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाकरेंच्या फेरनिवडीसाठी विनंती

दुसरीकडे, शिवसेना प्रमुख पदाचा उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने फेरनिवडीसाठी निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे. एक तर पक्षांतर्गत निवडणुकांना परवानगी द्या, नाही तर अंतिम निर्णयापर्यंत या पदासाठीची मुदतवाढ द्या, अशी मागणी ठाकरे गटाने आयोगाला केली आहे. ठाकरे गटाची ही मागणी निवडणूक आयोग मान्य करणार का?, यावर उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचे भवितव्य ठरणार आहे.

पक्षप्रमुख पद घटनाबाह्य, शिंदेंचा दावा
तर, शिवसेनेतील पक्षप्रमुख हे पद पक्षाच्या घटनेशी सुसंगत नाही, त्यामुळे बेकायदेशीर आहे असा दावा शिंदे गटाने केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुखपद निर्माण केले असून जुन्या घटनेत बदल न करताच झाले, असा आरोप गेल्या सुनावणीत शिंदे गटाने केला होता.

शिंदे हे मुख्य नेता नाही - ठाकरे

शिंदे गटाच्या या आरोपांवर ठाकरे गटाचे वकिल सनी जैन यांनीही प्रत्युत्तर दिले होते की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते असताना 'पक्षाच्या संविधानावर श्रद्धा आणि निष्ठा ठेवेन', अशी शपथ घेतली. आज त्याच घटनेला ते बेकायदा म्हणत आहेत. शिंदे स्वत:ला 'मुख्य नेता' म्हणत आहेत. मुळात शिवसेनेच्या घटनेत असे कोणतेही पद नाही.

संबंधित वृत्त:

पक्षांतर्गत निवडणुका घेऊ द्या:ठाकरे गटाची आयोगाला विनंती, 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार

निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाची घमासान लढाई सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदावरच शिंदे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे, याच पदाचा उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपत आहे. ठाकरे गटाने त्यामुळे फेरनिवडीसाठी निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...