आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस प्रवक्ते भाई जगताप भडकले:मनपा निवडणुकीच्या आरक्षणाचा फटका बसल्याने शिवसेनेवर आगपाखड; म्हणाले- न्यायही मिळत नाही

पनवेलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र नांदणाऱ्या शिवसेना आणि काॅंग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस चहाट्यावर आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप यांनी महापालिका निवडणुकीवरुन शिवसेनेवर तोफ डागली. आमच्या कोणत्याच मागण्या शिवसेनेकडून पूर्ण केल्या जात नाही, शिवसेना आम्हाला योग्य न्याय देत नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत अशी उघड भूमिका घेतली आहे.

महानगरपालिका निवडणुकांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद दिसून येत आहे. मनपा आयुक्त शिवसेनेच्या दबावाखाली काम करत असल्याचे म्हणत काँग्रेसच्या नगरसेवकांचे वार्ड राखीव ठेवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भाई जगताप म्हणाले?

मुंबई महापालिकेत फक्त 23 जागांची आरक्षण सोडत झाली आहे. त्यामधील काँग्रेसच्या 21 नगरसेवकांच्या आरक्षण बदली झाले आहेत. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हे शिवसेनेच्या दाबावाखाली काम करत आहेत, असा आरोपही भाई जगताप यांनी यावेळी केला आहे. काँग्रेसच्या कोणत्याच मागण्या शिवसेनेकडून पूर्ण केल्या जात नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेवर नाराज आहोत. पुढे ते म्हणाले की, शिवसेना आम्हाला योग्य न्याय देत नाही. आत्तापर्यंत फक्त चर्चा झाली पण त्यात कोणताही मार्ग हा सुटलेला नाही आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यावेळी म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर मुंबई महानगर पालिकेच्या संदर्भात 2 ते 3 बैठका झाल्या आहेत.

मात्र त्यानंतरही काही बदल झाला नाही. उलट ज्या वॉर्डमध्ये मागासवर्गीय लोकांची संख्या कमी आहे. त्या वॉर्डचे आरक्षण एससीमध्ये झाले आहे आणि अशी बरीच उदाहरण या आरक्षण सोडतीमध्ये बघायला मिळाली आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात यासंदर्भात दाद मागणार, असे देखील भाई जगताप यांनी यावेळी म्हटले आहे.

मविआत बिघाडी का?

गेली अनेक दिवस महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे संजय राऊत उद्धव ठाकरेंच पुढील 25 वर्षे मुख्यमंत्री राहतील असे सांगत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल असा दावा केला जात आहे. असे असताना या वादात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. यात भाई जगताप यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना मुंबई मनपाच्या अनुषंगाने शिवसेना आम्हाला न्याय देत नाही, आम्ही त्यासाठी कोर्टात जाऊ असे म्हटल्यांने आता मविआतून त्यावर काय प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...