आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाची लागण:शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिला 'हा' सल्ला

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्यातील खासजी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिंदे यांनी स्वत: याबाबत ट्वीट करत याविषयी माहिती दिली. त्यांच्या ट्विटनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे ट्वीट रीट्वीट करत शिंदे यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, 'गेले 6 महिने करोना विरुद्धचा लढा आपण देखील फ्रंटलाईनवरून लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल ही खात्री मला आहेच, पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा,' असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, "काल मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती." तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्यातील खासजी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...