आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेडणेकरांची राणांवर टीका:म्हणाल्या - राणा दाम्पत्याला सी ग्रेड पब्लिसिटी लागते; प्रसिद्धीसाठी ते काहीही करू शकतात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राणा दाम्पत्याला सी ग्रेड पब्लिसिटी लागते; प्रसिद्धीसाठी ते काहीही करू शकतात, असा टोला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. त्यासाठी काहीही बरळायचे ही त्यांची सवय आहे. संविधानिक पदे आहेत त्यावर डायरेक्ट हल्ला करताय असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या बोलण्यावर लक्ष द्यायला हवे, जात जुमल्याच्या प्रकरणात त्यांना सोडले आहे. त्यांना अटी शर्थीसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ते सर्व गोष्टींचा भंग करत आहे, त्यांच्याकडून न्यायालयाचा अवमान सुरू आहे. राणा दाम्पत्य संविधानाच्या गोष्टी करत असले तरी ते संविधानाला मानत नाहीत असे दिसून आले आहे.

राणा दाम्पत्य लोकप्रतिनिधी असतील तरी, ते वाह्यात पणे राज्यात काम करत आहेत, त्यांच्यावर कोर्टाने योग्य ती कारवाई करायला हवी, मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई नक्की होईलच असेही पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. ज्या गोष्टी व्यक्तिगत असायला हव्या त्या त्यांनी ठेवल्या नाही, आणि त्या सांगणार का काय खाजगी माहिती विचारली म्हणून असे वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

राणा दाम्पत्यावर पेडणेकरांचे टीकास्त्र

गेली अनेक दिवस शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यात वाद सुरू आहे. राणा दाम्पत्याला आक्रमकपणे विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर एकही संधी सोडत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...