आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते मुंबईच्या प्रसिद्ध कराची स्वीट्सच्या मालकांना या दुकानाचे नाव बदलण्यासाठी धमकावताना दिसत आहेत. ताज्या माहितीनुसार, स्वीट शॉपच्या मालकाने यावर सहमती दर्शवत कराची शब्द कागदाने झाकला आहे.
हे शॉप मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरात आहे. व्हिडिओमध्ये शिवसेना नेता म्हणत आहेत की, 'मी तुम्हाला काही वेळ देत आहे. या वेळेनुसार तुम्ही तुमच्या दुकानाचे नाव बदला आणि मराठीमध्ये एखादे नाव द्या. व्हिडिओमध्ये नितीन पुढे म्हणत आहेत की, 'ते कराची नावाचा द्वेष करतात. कारण हे पाकिस्तानात आहे. यामुळे ते हे नाव हटवण्यास सांगत आहेत'
पाकिस्तानातून आले होते दुकान मालकाचे पूर्वज
जेव्हा दुकान मालकाने शिवसेना नेत्याला सांगितले की, त्यांचे पूर्वज पाकिस्तानातून आले होते आणि त्याचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले, तेव्हा नांदगावकर यांना म्हटले की, येथे (भारतात) स्वागत आहे, मात्र त्यांना दुकानाचे नाव बदलावे लागेल. शिवसेना नेत्याने म्हटले, 'तुम्ही तुमच्या पूर्वजांचे किंवा मराठीमध्ये कोणतेही नाव देऊ शकता.'
शिवसेना नेत्याला समजावण्याचा प्रयत्नही झाला
या व्हिडिओमध्ये दिसतेय की, दुकान मालकाने शिवसेना नेत्याला हे समजावण्याचा प्रयत्न केला की, त्याचा कराचीशी काहीच संबंध नाही. यानंतरही शिवसेना नेत्याने ऐकले नाही.
शिवसेना नेता म्हणाले की, 'मी कराची नावाचा द्वेष करतो कारण हे दहशतवाद्यांचे ठिकाण आहे. कराची शब्दाचा कोणताही व्यवसाय होऊ नये. हे नाव तुम्हाला बदलावे लागेल... आम्ही तुम्हाला वेळ देत आहोत.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.