आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता डोक्यावरुन पाणी गेले:"हमने बहोत बर्दाश्त किया है, अब बर्बादही हम करेंगे" खासदार संजय राऊत यांचा भाजपला इशारा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवेसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात असतील असा गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे भाजपचे ते तीन नेते कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे की, उद्या शिवसेना भाजप विरोधात मोठा गौप्यस्फोट करणार आहे. उद्या शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. मीही असेल. शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी असतील. ही शिवसेनेची पत्रकार परिषद असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पुढे राऊत म्हणाले की, उद्या आम्ही बोलणार तेव्हा संपूर्ण देश ऐकेल. उद्या काय होते ते बघाच. आता मी काहीच सांगणार नाही. उद्याच काय ते सांगू, असे सांगतानाच हमने बहोत बर्दाश्त किया है, अब बर्बादही हम करेंगे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर आरोपांचा चिखल उडवला जातोय, त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल. देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असे काही जण बोलत आहेत. पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन नेते अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील. भाजपचे साडेतीन लोकं लवकरच तुरुंगात असतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यामुळे हे साडेतीन लोकं कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डोक्यावरुन खूप पाणी गेलंय?

संजय राऊत म्हणाले की, आम्ही खूप सहन केले आहे आणि आता आम्हीच बर्बाद पण करणार, डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. उद्या राऊत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथे संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तर मिळेल असे राऊत म्हणाले.

त्यांचा पेपर मी का फोडू नाना पटोले
संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना उद्या ज्या साडेतीन शहाण्यांबद्दल बोलणार आहेत, त्यांचा पेपर मी आज का फोडू? एक नक्की आहे की आज त्या साडेतीन शहाण्यांना झोप लागणार नाही, मला माहित आहे ते कोण आहेत, पण जरा सस्पेन्स राहू देत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

10 मार्चला सरकार कोसळेल- चंद्रकांत पाटील

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील नेहमीच महाविकास आघाडी सरकार कोसळ्याचे भाकित वर्तवत असतात. पाटीलांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचा दावा केला आहे. येत्या 10 मार्चला महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असा दावा पाटलांनी केला आहे. 10 मार्चला 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्यादिवशी महाविकास आघाडी सरकार कोसळेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...