आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्यावर्षी राऊत यांच्या छातीत ब्लॉक आढळले होते

शिवसेना नेते संजय राऊत यांना आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येईल. गेल्या वर्षी लीलावती रुग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, त्यांना परत त्रास सुरू झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार परत एकदा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळले होते. त्यासंबंधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर एप्रिल 2020 मध्ये आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण, कोरोनामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. तीच शस्त्रक्रिया उद्या करण्यात येणार आहे. लीलावती रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर मॅथ्यू आणि डॉ. मेनन हे राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करतील. आज सायंकाळपर्यंत संजय राऊत रुग्णालयात दाखल होणार असून उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser