आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरीट सोमय्यांचा सवाल:शिवसेना नेते यशवंत जाधवांनी 24 महिन्यांत खरेदी केल्या 36 इमारती, नेत्याकडे इतकी तर मालकांकडे किती संपत्ती?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी २४ महिन्यात मुंबईत ३६ इमारती विकत घेतल्या असून त्यांच्याकडे इतकी संपत्ती असेल तर त्यांच्या मालकांकडे किती संपत्ती असेल, असा प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी (ता.२०) केला. दरम्यान, याबाबत शिवसेनेकडून अजून प्रतिक्रिया आली नाही.

यशवंत जाधव यांच्या भायखळा येथील घरावर मागच्या महिन्यात आयकर विभागाने छापा टाकला होता. आयकर खात्याचे अधिकारी तब्बल ७० तास जाधव यांच्या घरी छापेमारी करत होते. तेव्हा या विभागास जाधव कुटुंबीयांची तब्बल १३० कोटींची मालमत्ता आढळून आली होती. जाधव यांच्याकडे मुंबईचा आगामी महापौर म्हणून पाहिले जात होते. आगामी पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका मुख्य असणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

मालमत्तांमध्ये घर, दुकान, गाळेही
जाधव कुटुंबीयांनी २४ महिन्यांत मुंबईत घर, दुकान, गाळे अशा १००० मालमत्ता असलेल्या ३६ बिल्डिंग विकत घेतल्या आहेत. त्यामध्ये १००० कोटींचा घोटाळा बाहेर उघडकीस आला आहे. ईडी, आयकर विभाग तपास करत असून काही दिवसांत कारवाईची अपेक्षा आहे, असे सोमय्या म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...