आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना खासदार गाजीपूर सीमेवर:संजय राऊतांनी घेतली राकेश टीकैत यांची भेट, टीकरी सीमेवर लावलेल्या खिळ्यांवरुन व्यक्त केला संताप

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीकरी बॉर्डरवर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्यासाठी मोठे खिळे लावले आहेत.

दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. दरम्यान राऊतांनी टीकरी सीमेवर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या मोठ्या खिळ्यांवरुन संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी आपला संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर आपण आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले होते. त्यानुसार ते गाझीपूर सीमेवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली आहे. दरम्यान टीकरी बॉर्डरवर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्यासाठी मोठे खिळे लावले आहेत. तसंच बॅरिकेट्सची भिंतही उभारण्यात आली आहे. यावरुनही संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना त्यांनी या विषयावर भाष्य केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी आम्हा सर्व खासदारांना आदेश दिला. ज्याप्रकारे सरकारतर्फे अन्याय, दहशत केली जात आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे, पाठबळ देणे आपले कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप, संवेदना घेऊन आपण येथे पोहोचलो असल्याचे राऊत म्हणाले.

खिळ्यांवरुन व्यक्त केला संताप
टीकरीवर पहिले 4 फूट जाड सीमेंटची भींत बनवून 4 लेयरमध्ये बॅरिकेडिंग करण्यात आली. आता रस्ता खोदून त्यामध्ये टोकदार खिळे लावण्यात आले आहेत. याविषयावर बोलताना ते म्हणाले की, 'एवढे मोठे खिळे चीनच्या सीमेवर लावले असते तर चिनी सैन्य 20 किमी आत घुसले नसते'.

मैदानात येऊन पाठिंबा देणे महत्त्वाचे
संजय राऊतांनी आज आंदोलन स्थळावर येत शेतकऱ्यांची भेट घेतली. याविषयी बोलताना राऊत म्हणाले की, देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने येथे येऊन आपल्या भावना व्यक्त करणे त्यांचे कर्तव्य आहे. पुढे ते म्हणाले की, 'राकेश टिकैत यांच्यासोबत आम्ही यापूर्वी फोनवर बोललो होतो. मात्र प्रत्यक्षात मैदानात येऊन पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्रत्यक्ष रणभूमीवर येऊन पाठिंबा जाहीर केला' अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.