आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबराव पाटील यांची सडकून टीका:आधी गुजरातला गाठलं, मग मोदींवर टीका करत शरद पवारांची मुलाखत घेतली; आता शरद पवार वाईट झाले ऋतूप्रमाणे राज ठाकरे बदलतात

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील पाडवा मेळाव्यात शिवसेना राष्ट्रवादीवर कडाडून हल्ला चढविला होता. शरद पवार यांच्यावरही ठाकरी तोफ डागली होती. त्यांच्या या भाषणावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली आहे. राज ठाकरे हे ऋतूप्रमाणे आपल्या भूमिका बदलतात, त्याने एखाद्या मतावर ठाम राहावं. त्यांची ही भूमिका पाहून मनसे पक्ष आणि ते दिशाहीन झाल्याचं वाटत आहे. दिशा असणारे ते कधीच आपली ध्येयधोरणे बदलत नसतात. मनसेला यश मिळत नसल्याने राज ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेच्याच हिंदुत्वाचा मुद्दा पकडला आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. त्याप्रमाणे राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केली, तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशातील लोकांना लक्ष्य केले. पण, हाताला काहीच लागत नसल्याने त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे टर्न केला. गुजरातला गेले. पण, पुन्हा मोदींवर टीका केली आणि बारामतीत गेले, शरद पवारांची मुलाखत घेतली. आता शरद पवार वाईट झाले, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

त्यांनी एका मुद्द्यावर ठाम राहावं -
गेल्या काही दिवसांतील राज ठाकरे यांची भाषणे ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला सपोर्ट करणारी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारी असल्याचं पाहायला मिळाले होते. पण, आता त्यांनी पुन्हा आपली भूमिका बदलली आहे. त्यांचे विचार नेहमी ऋतू बदलावे तसे राहिले असून आता येत्या काही महिन्यात अजून ते काय पुढे आणतील, हे सांगता येत नाही. अशी भूमिका बदलणे त्यांना शोभत नाही. त्यांनी एका मुद्यांवर ठाम राहावं. कारण भरकटणारी नाव कधीच नय्या पार करू शकत नाही, असो टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

राज ठाकरे चंचल माणूस -
राज ठाकरेंना मी लहानपणापासून ओळखतो. हाफ चड्डीपासून मी शिवसैनिक आहे. आमच्या जिल्ह्यात ते यायचे. चंचल माणूस आहे, चंचल स्वभावामुळे या गोष्टी होत असतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...