आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आमदार अडचणीत:प्रताप सरनाईक यांच्या रिसॉर्टवर ED आणि CBI चा छापा; किरीट सोमय्यांनी सोशल मीडियावर विचारले- कुठे आहात प्रताप सरनाईक?

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात रडारवर असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, सक्तवसुली संचलनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) याप्रकरणात लोणावळा येथील एका रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. काहीवेळापूर्वीच ED आणि CBI चे अधिकारी याठिकाणी पोहोचले असून याठिकाणी सध्या शोधसत्र सुरु आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय आणि ईडीने प्रताप सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी ही धाड टाकल्याची चर्चा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. याबाबत थोड्याचवेळात अधिकृत माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

कुठे आहात सरनाईक? भाजप नेत्याचा सवाल

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर सुरुवातीला प्रताप सरनाईक कुठे आहात? असा प्रश्न विचारताना पोस्ट केले. त्यानंतर त्यांनी इंग्रजीत आणखी एक सोशल मीडिया पोस्ट केली.

"सरनाईक यांनी एनएसईएलमध्ये कथित घोटाळ्यात मिळवलेल्या पैशातून तिटवाडा येथे 78 एकरची जमीन खरेदी केली. काही दिवसांपूर्वीच त्याचा पार्टनर योगेश देशमुखला अटक करण्यता आली आहे. सरनाईक यांचा आणखी एक पार्टनर मोहित अग्रवाल याने एनएसईएलमधून 216 कोटी रुपयांचा अपहार केला. गेल्या काही दिवसांपासून ईडी (अंमलबजावणी संचनालय) प्रताप सरनाइक यांच्या मागे आहे. सरनाइक यांचे नाव एमएमआरडीए घोटाळ्यात सुद्धा आले आहे." असे सोमय्या यांनी लिहिले.

यापूर्वी ईडीने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. परंतु, नंतर हा तपास काहीसा थंडावला होता. मात्र, आता प्रताप सरनाईक यांच्या रिसॉर्टवर धाड टाकल्यामुळे याप्रकरणात नवी माहिती पुढे येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...