आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सिंधुदुर्ग:शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण, जिल्ह्यात सातत्याने दौरे करून परिस्थितीवर ठेवत होते लक्ष

सिंधुदुर्ग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. दरम्यान, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला. गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणात निघालेले आहेत. दरम्यान आमदाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र सोमवारी रात्री शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला. यामुळे एकच खळबळ उडाली.  कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक हे जिल्ह्यात सातत्याने दौरे करून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते.  विशेषतः कुडाळ आणि मालवण या त्यांच्या मतदारसंघात नेहमी दौऱ्यावर होते.