आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेनेच्या कोकणातील आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार केली. मंगळवारी कोकणातील सेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पाच सेना आमदार हजर होते.
मुख्यमंत्री सध्या शिवसेना आमदारांच्या विभागीय बैठका घेत आहेत. मंगळवारी कोकणची बैठक होती. बैठकीला उदय सामंत, भरत गोगावले हे कोरोना संसर्गामुळे अनुपस्थित हाेते. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे गैरहजर होते. तर मंत्रिपद न मिळाल्याने नाराज भास्कर जाधव यांनी बैठकीला दांडी मारली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १६७ कोटी निधीची तरतूद होती. मात्र वित्त विभागाने तो दिला नाही, अशी तक्रार या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे वित्त विभाग आहे. याप्रश्नी मुख्यमंत्री यांनी सिंधुदुर्गवर अन्याय होणार नाही, मी याप्रकरणी लक्ष घालतो, अशी हमी आपल्या आमदारांना दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.