आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंच्या अटकेवर शिवसेनेचे मत:खासदार अरविंद सावंत म्हणाले - पंतप्रधानांनी राणेंच्या भाषेवर उत्तर द्यायला हवे, राजकारणात उद्धव ठाकरेंसारखे शालिन नेता नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राणेविरोधात नाशिक आणि पुण्यासह चार शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दैनिक भास्करशी विशेष संवाद साधला आणि या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेची बाजू मांडली आहे. राणेंच्या भाषेवर आक्षेप घेत माजी केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेही यावर आपले मत देण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी केलेल्या वक्तव्यावरही उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आणि नंतर जामिनावर सुटलेल्या नारायण राणे यांनी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा महाराष्ट्रातील रत्नागिरी येथून 'जन आशीर्वाद यात्रा' सुरू केली आहे. राणेविरोधात नाशिक आणि पुण्यासह चार शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मात्र तरीही राणे आपल्या विधानावर ठाम आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने राणेंच्या अटकेला 17 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत काय म्हणाले...

प्रश्न: नारायण राणे प्रकरणावर तुमचे काय म्हणणे आहे?
उत्तर: मला देशाच्या पंतप्रधानांना विचारायचे आहे की ते नारायण राणे यांच्या भाषेचे समर्थन करतात का? ही 'जन आशीर्वाद यात्रा' फक्त अशी भाषा बोलण्यासाठी काढली जात आहे का? या गोष्टींची उत्तरे खुद्द पंतप्रधानांनी द्यायला हवीत, कारण नारायण राणे हे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि त्यांची भाषा सर्वांनी ऐकली आहे.

प्रश्न: भाजपचा आरोप आहे की महाविकास आघाडी सरकार दुर्भावनेने कारवाई करत आहे
उत्तर: तसे मुळीच नाही, आमचे सरकार कायद्यानुसार काम करत आहे. आम्ही ईडी आणि सीबीआयचा भाजपसारखा गैरवापर करत नाही. आम्ही संविधानाचे पालन करणारे लोक आहोत, कायदा काय म्हणेल त्यानुसार कारवाई केली जात आहे.

प्रश्न: नारायण राणे म्हणाले की ते अजूनही त्यांच्या गोष्टीवर कायम आहेत. यावर तुम्ही काय म्हणाल?
उत्तर: राणे यांनी न्यायालयात लेखी माफी मागितली आहे, न्यायालयाने आतापर्यंत फक्त राणे यांना जामीन दिला आहे. त्यांची अद्याप पूर्णपणे सुटका झालेली नाही. राणे यांनी जामिनावेळी न्यायालयात लेखी माफी मागितली आहे. देशाचे मंत्री वारंवार त्यांच्या शब्दांवरुन पलटी मारत आहे.

प्रश्न: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी यांच्याबद्दल 'आक्षेपार्ह' भाषा वापरली होती, त्यांच्यावर कारवाई का केली गेली नाही असा भाजपचा आरोप आहे
उत्तर: हा फक्त आरोप आहे. उद्धव ठाकरे यांनी सीएम योगींबाबत कधीही चुकीचे शब्द वापरले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा संयमाने चालणारा दुसरा नेता देशात नाही. हे सर्व भाजपाच्या लोकांद्वारे पसरवले जात आहे, जे कोणत्याही तथ्याशिवाय या गोष्टी पसरवत आहेत. देशातील जनता सर्व काही पाहतेय.

प्रश्न: जेपी नड्डा यांनी म्हटले आहे की आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही, हा सर्व 'जन आशीर्वाद यात्रा' थांबवण्याचा प्रयत्न आहे.
उत्तर: नड्डा यांनी हेही उत्तर दिले पाहिजे की त्यांच्या पक्षाचे आणखी तीन मंत्रीही त्याच राज्यात 'जन आशीर्वाद यात्रा' काढत आहेत, त्यांनी कोणत्याही समस्येला का तोंड दिले नाही? या यात्रेत, कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल प्रकरणे नोंदवली जात आहेत, जी कायद्यानुसार आहेत. पंतप्रधानांनी स्वतः कोरोनाबाबत नियम बनवले आहेत. त्यांनी 'दोन फूट अंतर' आणि 'गर्दी करू नये' असे त्यांनीच सांगितले आहे. त्यामुळे जिथे नियम मोडले जात आहेत, तिथे कारवाईही केली जात आहे.

प्रश्न: नारायण राणे म्हणाले आहेत की जर मी चुकीचा होतो तर शिवसेनेने मला मुख्यमंत्री का बनवले.
उत्तर: मला त्याबद्दल काहीही सांगायचे नाही, कारण मला मूर्ख व्यक्तीसाठी माझा वेळ वाया घालवायचा नाही.

बातम्या आणखी आहेत...