आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज यांच्या घरी राऊत:राज ठाकरेंचे नवे घर 'शिवतीर्थ'वर पोहोचले संजय राऊत, दिर्घकाळानंतर झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी पोहोचले. संजय राऊतांनी 'शिवतीर्थ' या नव्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. मोठ्या कालावधीनंतर या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. दरम्यान या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आहे.

संजय राऊत आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले होते. राऊतांच्या कन्येचे 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. त्या विवाह सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी संजय राऊत सपत्नीक राज यांच्या घरी गेले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास गप्पा झाल्या. मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका देऊन संजय राऊत निघाले तेव्हा राज ठाकरे स्वत: त्यांना दरवाजापर्यंत सोडवण्यासाठी आले होते. यावेळी शर्मिला ठाकरे व राज अमित ठाकरे देखील उपस्थित होते.

10 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. दक्षिण मुंबईमधील सिलव्हर ओक या निवासस्थानी राऊत गेले होते. त्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनाही लग्नाचं आमंत्रण दिले होते अशी माहिती होती.

बातम्या आणखी आहेत...