आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजय राऊतांचा कंगनावर निशाणा:बंगला पाडण्याचा विरोध करणाऱ्या आभिनेत्रीने हाथरस पीडितेसाठीही आवाज उठवावा,राहुल गांधींसोबत झालेल्या वर्तनाला म्हणाले 'हा तर लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार'

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींना केलेल्या धक्काबुक्कीचा संजय राऊतांनी केला निषेध

शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटले की, ज्या लोकांनी अभिनेत्री कंगना रनोटचा बंगला पाडण्याच्या कारवाईवर त्यांच्या पक्षाचा विरोध केला होता. त्यांनी आता हाथरस येथील बकात्कार प्रकरणात त्या पीडित मुलीसाठी आवाज उठवायला हवा. त्यांनी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असलेले काँग्रेस नेता राहुल गांधींसोबत झालेल्या गैरवर्तनाचा निषेध केला आहे.

आता हाथरस पीडितेसाठी कंगनाने आवाज उठवावा
शिवसेना खासदार संजय राऊतांनी अभिनेत्री कंगना रनोटवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'ज्या लोकांनी एका अभिनेत्रीचे अवैध बांधकाम पाडण्याचा कारवाईचा विरोधात आवाज उठवला होता. त्यांनी हाथरस पीडितेसाठी न्याय मागितला पाहिजे.'

राहुल गांधींना केलेल्या धक्काबुक्कीचा केला निषेध
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध केला. ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलिस वागले. त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडण्यात आले. हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभत नाही. हे म्हणजे देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार असल्याचे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...