आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाविकास आघाडी मजबूत:शरद पवारांनी पहिल्यांदाच मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट, राउत म्हणाले- महाविकास आघाडीचे सरकार मजबूत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पवार, ठाकरे भेटीवर सरकारच्या स्थिरतेबाबत चर्चा होत असतील तर ती पोटदुखीच -राउत
  • आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकार अजुनही मजबूत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या वतीने मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, शरद पवारांनी सोमवारी सकाळी राज्यपालांची सदीच्छा भेट घेतली. त्यानंतर भाजप खासदार नारायण राणे आणि इतर भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तेव्हापासूनच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला. त्यातच शरद पवारांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच मातोश्रीवर जाउन सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमके काय झाले हे अद्याप समोर आलेले नाही.

सरकार मजबूत चिंता नसावी

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राउत म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. त्यामुळे, कुणीही याची चिंता करू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सोमवारी संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. यावर कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्या पसरवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. कुणीही चिंता करू नये असेही राउत यांनी ट्विट करून म्हटले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी

तत्पूर्वी शरद पवारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली. ही भेट राजकीय नसून केवळ सदीच्छा भेट होती असे सांगण्यात आले. या भेटीत पवारांसोबत जयंत पाटील देखील उपस्थित होते. राज्यपालांनी आम्हाला केवळ चहापानासाठी बोलावले होते असे ते म्हणाले. तरीही या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळाले नाही. त्यातच भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेउन राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी सुरू केली. त्यामुळे, महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्यातील एकूणच परिस्थितीवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...