आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांवर सातत्याने निधाणा साधत असल्याचे दिसते. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाक् युद्ध सुरू आहे. यावरुनच शिवसेनेने चंत्रकांत पाटलांवर अग्रलेख लिहिला होता. या अग्रलेखाला उत्तर देताना पाटलांनी पीएमसी बँक घोटाळ्याविषयी राऊतांवर भाष्य केले होते. यावरुन राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. यानंतर चंद्रकांत पाटलांनी खोचकपणे ही किंमत थोडी वाढवा असे म्हटले होते. आता यावर राऊतांनी उत्तर दिले आहे.
या मिश्किल टिप्पनीवर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले आहेत की, 'आत्मसन्मानाची गोष्ट असते, त्यामुळे किंमत काही असली तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील मात्र त्या पैशांवर आमचे घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात'
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'आम्ही सामान्य लोकं आहोत. आम्ही आमचे पैसे कमवतो आणि खातो हे त्यांना देखील माहिती आहे. त्यांना सगळीकडे पैसेच दिसतात. त्यांचा पक्ष पैसेवाल्यांचा पक्ष आहे' असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला आहे.
सव्वा रुपयांच्या दाव्यावर काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
'शिवसेना नेते संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचे मी ऐकलेय. कोणी 100 कोटी आणि 50 कोटीचे दावे करत आहेत. आता हे सव्वा रुपयाचा दावा करत असल्याचे दिसतेय. पण संजय राऊत माझे मित्रं आहेत. त्यामुळे मी त्यांना सूचवेल की किंमत थोडी वाढवावी लागेल. कारण शेवटी मानहानीचा दावा म्हणजे काय? माझी मानहानी झाली ती मानहानी एवढ्या कोटीची आहे, असा मानहानीचा अर्थ होतो. राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नाही. त्यांनी ती मानहानी वाढवावी'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.