आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुभकार्य:शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा संपन्न, मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला सोहळा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपूत्र मल्हार नार्वेकर यांच्याशी झाला साखरपुडा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वेशी हिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपूत्र मल्हार नार्वेकर यांच्याशी पूर्वेशीचा साखरपुडा संपन्न झाला आहे. यावेळी संपूर्ण राऊत कुटुंब हजर होते. तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.़

आज दुपारी बरोबर सव्वा बाराच्या मुहूर्तावर पंचतारांकित हॉटेल ग्रँड हयातमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. आज संध्याकाळी 7 वाजता राजकीय मान्यवर आणि दिग्गज मंडळी साखरपुड्याला हजेरी लावणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील प्रमुख राजकीय नेते या साखरपुड्याला हजेरी लावणार आहे.

बातम्या आणखी आहेत...