आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा विरोधकांवर घणाघात:म्हणाले- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून टीका करणारे नामर्द, त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे राज्यात उत्साह

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर टीका करणारे नामर्द आहेत, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. आजारपण हे कधी कोणावर येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आजारपणाच्या काळात झालेली टीका ही माणुसकी आणि नीतीमत्तेला धरुन नव्हती. विरोधक नामर्दपणे मुख्यमंत्र्यांवर टीका करत राहिले, असे राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

राज्यातील जनतेने त्यांना प्रत्युत्तर दिले. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवतीर्थावरील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित होते. त्यामुळे राज्यातील जनता उत्साहात आहे. मात्र, ज्या कोणी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरुन टीकाटिप्णी केली आहे, त्यांच्या अंतरंगात किती घाण आहे, हे दिसून आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत बोलत होते.

बाळासाहेबांना पद्म पुरस्कार का दिला नाही?

फडणवीसजी तुम्ही इतक्या लोकांना पद्म पुरस्कार देता, मग तुमच्या केंद्र सरकारला बाळासाहेब ठाकरे यांना आजपर्यंत पद्मविभूषण किंवा भारतरत्न पुरस्कार द्यावासा का वाटला नाही? याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करावा. मग आम्हाला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ट्विटवर बोलता येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...