आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेगासस प्रकरणावरुन संसदेत चांगलाच गदारोळ उडाला आहे. विरोधी पक्षांकडून याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे सरकार या आरोपांचे खंडन करत असून हा लोकशाहीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हणत आहे. त्यामुळे आज संसदेचे दोन्ही सभागृह काही काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष एकमेकांवर टीकाटीप्पणी करत आहे. याच पाश्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे.
ते म्हणाले की, पेगासस प्रकरणावरुन देशात कोणीही सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. ही केवळ हेरगिरीच नव्हे तर देशाशी मोठा धोका असून विश्वासघात असल्याचे राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. याप्रकरणी आम्ही संसदेत आवाज उठवणार असून सरकारमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करावी असं खुलं आव्हान राऊत यांनी केंद्र सरकारला दिले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील मोठं मोठे अधिकारी, वकील, राजकारणी, पत्रकार, कार्यकर्ते आदींवर पाळत ठेवली जायची असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
यामाध्यमातून देशातील मोठ्या व्यक्तींवर पाळत
मोदी सरकार या सॉफ्टवेअरच्या मदतीने अनेक नेत्यांचे फोन टॅप करतोय. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक आयुक्त अशोक लवासा, केंद्रातील दोन मंत्री आदीवर पाळत ठेवत होते असा गौप्यस्फोट ही त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, लवसा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी आचार संहितेचा भंग केल्याचे म्हटले होते. असे म्हणणारे ते एकमेव निवडणूक आयुक्त होते. या कारणामुळे त्यांच्यावर पाळत ठेवली गेली हे खूपच गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हावी असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.